सोलापूर : दीपावलीचा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. बाजारात आकाश कंदील खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. तर दुसरीकडे सोलापूर शहरातील सात रस्ता येथे चक्क माती पासून बनवलेल्या आकाश कंदील हे विक्रीसाठी बाजारात आले आहे. सोलापुरी चादरीप्रमाणे विकास कुंभार यांनी स्वतःची नवी ओळख या कंदील पासून निर्माण केली आहे.
advertisement
काय आहे किंमत?
विकास कुंभार रा.नीलमनगर सोलापूर असे मातीपासून पर्यावरण पूरक कंदील बनवलेल्या कुंभारचे नाव आहे. विकास कुंभार आणि देविदास कुंभार या दोन्ही भावांनी मिळून हा पर्यावरण पूरक कंदील बनवला आहे. मातीपासून तयार केले जाणारे आकाशदिवे त्यावरील सुंदर नक्षीकाम, वैविध्यपूर्ण आकारातील उपलब्धता, मनमोहक रंगसंगती, आतील बाजूस चमचमणारे बहुरंगी एलईडी दिवे, सहज टांगून ठेवता येईल अशी रचना, जपली जाणारी पर्यावरणपूरकता यामुळे स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
दिवाळीत घर सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलांच्या माळा, दादर मार्केटमध्ये 100 रुपयांपासून करा खरेदी
या कंदिलाची किंमत 250 रुपये पासून ते 350 रुपये पर्यंत आहे .पणत्याच्या बरोबरीने आता मातीचे आकाशकंदीलाचा नवा प्रकार लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. यावर्षीचे आकर्षण म्हणजे मातीचे आकाशकंदील होय. आतापर्यंत आकाशकंदील म्हणजे वेळूच्या काड्यापासून बनवलेला पारंपरिक आकाशकंदील मानले जातात.
त्यानंतर प्लॅस्टिकचे आकाशकंदील आले. पण आता त्याच्या स्पर्धेत आता मातीचे आकाशकंदील बाजारात आलेले आहेत. आकर्षक रंगसंगती सोबत त्यामध्ये कापून केलेली सजावटीने हा आकाशकंदील विशेषच मानला जातो. पारंपरिक प्रकारात मातीचा आकाशकंदील ही वेगळी परंपरा अखेर माती कलावंत यशस्वी ठरले आहेत.
सर्वसामान्यापासून उच्चभ्रू लोकापर्यंत मातीच्या कलाकुसरीच्या वस्तूचे स्थान वाढू लागले आहे. त्यामध्ये आता मातीचा आकाशकंदीलाची भर पडली आहे. मातीचा आकाशकंदील दीपावलीच्या सहा महिने अगोदरच बनवण्याचे काम सुरू करावे लागते. तसेच हा आकशकंदील परंपरागत फिरत्या चाकांवर बनवला जातो. माती पासून बनवलेला कंदील ग्राहकांना आकर्षक देखील करत आहे.