TRENDING:

Eknath Shinde Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा मुंबईतला मोहरा शिंदेंनी खेचला, डॅमेज कंट्रोलसाठी थेट मातोश्रीवरून धावाधाव, नेमकं घडलं काय?

Last Updated:

Eknath Shinde Uddhav Thackeray : आज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा मोहरा आपल्याकडे खेचला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपली ताकद मुंबईतही असून ठाकरेंची ताकद कमी झाल्याचे दाखवण्याचे प्रयत्न आता शिंदे गटाकडून सुरू आहे. आज एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा मोहरा आपल्याकडे खेचला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले.
ठाकरे गटाचा मुंबईतला मोहरा शिंदेंनी खेचला, डॅमेज कंट्रोलसाठी थेट मातोश्रीवरून धावाधाव, नेमकं घडलं काय?
ठाकरे गटाचा मुंबईतला मोहरा शिंदेंनी खेचला, डॅमेज कंट्रोलसाठी थेट मातोश्रीवरून धावाधाव, नेमकं घडलं काय?
advertisement

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे आणि भाजप वगळता इतर सर्व पक्षांचे जवळपास 123 नगरसेवक एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे खेचले आहेत. हे नगरसेवक मागील काही टर्ममधील आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईवरही आपले लक्ष केंद्रीत केले. मुंबईतील काही आमदारांनी शिंदे यांना बंडात साथ दिली. त्यानंतर शिंदे यांनी आपला मोर्चा नगरसेवकांकडे वळवला आहे.

advertisement

ठाकरेंचा मोहरा शिंदेंकडे, मातोश्रीवरून थेट हालचाली...

शिवसेना ठाकरे गटाचे सायन प्रतीक्षा नगर मधील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. रामदास कांबळे हे प्रभाग क्रमांक 173 चे माजी नगरसेवक असून त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तर, युवा सेनेचे विस्तारक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यामुळे कांबळे यांचा शिंदे गटातील पक्ष प्रवेश अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.

advertisement

'मातोश्री'वरून डॅमेज कंट्रोल...

रामदास कांबळे हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे आज सकाळी समोर आले. त्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवसैनिकांनी रामदास कांबळे यांच्या फलकाला काळं फासलं. मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली. प्रतीक्षानगर मधील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यानंतर मातोश्रीकडूनही डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न झाले. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाने सायन प्रतिक्षा नगर येथील शाखेत स्थानिक शिवसैनिकांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेतली. या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार अनिल देसाई यांच्या फोनवरून शाखेतील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक शिवसैनिक मातोश्रीसोबत असल्याची ग्वाही उपस्थितांनी दिली. आगामी निवडणुकीत रामदास कांबळे यांना चांगलाच धडा शिकवणार असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपला निर्धार सांगितला.

advertisement

इतर संबंधित बातमी:

BMC Elections : उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच शिंदे गटाने घेरलं, बीएमसी निवडणुकीआधी मोठ्या हालचाली...

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा मुंबईतला मोहरा शिंदेंनी खेचला, डॅमेज कंट्रोलसाठी थेट मातोश्रीवरून धावाधाव, नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल