TRENDING:

panvel news : मोबाईल जास्त वापरते म्हणून घरच्यांनी रागवलं, प्रियंका घर सोडून गेली आणि पुढे घडलं भयानक

Last Updated:

7 दिवसांनी बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पत्रात सापडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(पनवेलमधील घटना)
(पनवेलमधील घटना)
advertisement

पनवेल, 31 ऑगस्ट : हल्ली मोबाईलचं व्यसन लहान मुलांना इतकं जडलंय की जेवतानाही पोरं मोबाईल सोडत नाही. पनवेलमध्ये अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मोबाईल वरून ओरडले म्हणून एक 20 वर्षीय तरुण घर सोडून गेली आणि समुद्रात उडी घेऊन या तरुणी आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील कासारभाट गावात ही घटना घडली आहे. प्रियंका तांडेल (वय 20 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. प्रियंकाला घरातल्यांनी मोबाईल जास्त वापरतो म्हणून ओरडले होते. त्यामुळे ती 23 ऑगस्टच्या भर दुपारी रागाच्या भरात ती घरातून निघून गेली होती. संध्याकाळपर्यंत मुलगी घरी परतली नसल्याने घरातल्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि आपली मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली.

advertisement

(Video Viral : 10 रुपयांच्या पाणीपुरीसाठी दोघांची रस्त्यावरच हाणामारी; एकमेकांना आडवं पाडून धुतलं)

7 दिवसांनी बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह अरबी समुद्राला लागून असलेल्या पाताळगंगा नदीच्या खोल पत्रात सापडला. रात्रीच्या वेळी मच्छिमारी करताना एका मच्छिमाराला कुणा एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्याने त्यांनी जवळच्या पेण तालुका अंतर्गत दादर सागरी पोलीस ठाण्यात फोन करून सदर प्रकरणाची माहिती दिली.

advertisement

(पठ्ठ्या मालकाचे 50 हजार ऑनलाईन रमीत हारला अन् दिली चोरीची तक्रार, पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल)

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित गोळे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेत, बोटीच्या साहाय्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. मात्र केवळ मोबाईल जास्त वेळ वापरल्याने ओरड दिल्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
panvel news : मोबाईल जास्त वापरते म्हणून घरच्यांनी रागवलं, प्रियंका घर सोडून गेली आणि पुढे घडलं भयानक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल