Video Viral : 10 रुपयांच्या पाणीपुरीसाठी दोघांची रस्त्यावरच हाणामारी; एकमेकांना आडवं पाडून धुतलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एक तरुण दहा रुपयांत सात गोलगप्पे खायला घालायचे, अशी मागणी करू लागला. यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले.
नवी दिल्ली 31 ऑगस्ट : जर तुम्हालाही पाणीपुरी खायला आवडत असेल तर 10 रुपयांना मार्केटमध्ये किती गोलगप्पे मिळतात हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. पण एक तरुण दहा रुपयांत सात गोलगप्पे खायला घालायचे, अशी मागणी करू लागला. यानंतर जे काही घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले. पुढच्याच क्षणी दुकानदार आणि ग्राहक रस्त्याच्या मधोमध फिल्मी स्टाईलमध्ये भांडताना दिसले. मग त्यांनी एकमेकांना इतकं मारलं की विचारायलाच नको. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे.
पाणीपुरीसाठी झालेल्या या भांडणाचा व्हिडिओ कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की दोघं रस्त्यावर पडलेले असताना एकमेकांना मारहाण करत आहेत. रस्त्याने लोकांची ये-जा सुरू आहे, पण त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. यादरम्यान दोघेही जणू कुस्तीचा सामना सुरू असल्यासारखे भांडत आहेत
advertisement
Kalesh b/w a Golgappa seller and Customer over 10rs me 7 golgappa hi kyu? pic.twitter.com/kpa0kIeiQ8
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 30, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामसेवक नावाचा तरुण हमीरपूरमधील अकिल तिराहे येथे पाणीपुरी विकतो. तो पाच पाणीपुरी 10 रुपयांना विकतो. मात्र गावातील एका दबंग तरुणाने त्याला दहा रुपयात सात पाणीपुरी खायला घालण्यास सांगून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर जे काही घडलं ते तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
advertisement
ट्विटर अकाऊंट @gharkekalesh वर याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, '10 रुपयांमध्ये फक्त 7 का भाऊ.' पोस्ट आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका महिला यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिलं की, जर मला 20 रुपयांच्या चार पाणीपुरी खायला दिल्या असत्या तर मी तर त्याचा जीवच घेतला असता. दुसरा यूजर म्हणाला, 10 रूपयांत सात? इथे तर 20 रुपयांमध्ये सहा देतात.
Location :
Uttar Pradesh
First Published :
August 31, 2023 12:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video Viral : 10 रुपयांच्या पाणीपुरीसाठी दोघांची रस्त्यावरच हाणामारी; एकमेकांना आडवं पाडून धुतलं