Viral Video: मस्ती म्हणून मित्राला टायरमध्ये बसवून उतारावरुन ढकललं; नंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
या व्हिडिओमध्ये काही मित्रांनी त्यांच्या मित्रासोबत अशी भयानक मस्ती केली, ज्यामुळे त्याचा जीवच धोक्यात आला.
नवी दिल्ली 31 ऑगस्ट : जीवनात मनोरंजनाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मनोरंजनाशिवाय जीवन जगणं अतिशय अवघड आहे. आजकाल प्रत्येक व्यक्ती आपलं आवडतं काम करून आपला मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करतो. कोणी टीव्ही पाहून स्वतःचं मनोरंजन करतं तर कोणी संगीत ऐकून. काही खरेदी करून किंवा प्रवास करून स्वतःचं मनोरंजन करतात, तर काही वेगवेगळे खेळ खेळून किंवा मित्रांसोबत विचित्र मजा करून मन प्रसन्न ठेवतात. मात्र, बरेचदा लोक केवळ मौजमजेसाठी आपल्या मित्रांचा जीव धोक्यात घालतात.
तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये मुलं-मुली त्यांच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसतात. लोकांनाही असे व्हिडिओ खूप आवडतात. मात्र, सध्या इंटरनेटवर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याने नेटकऱ्यांच्या अंगावर काटा आणला. या व्हिडिओमध्ये काही मित्रांनी त्यांच्या मित्रासोबत अशी भयानक मस्ती केली, ज्यामुळे त्याचा जीवच धोक्यात आला.
— CCTV IDIOTS (@cctvidiots) August 29, 2023
advertisement
खरं तर झालं असं, की काही मुलांनी त्यांच्या एका मित्राला एका मोठ्या टायरमध्ये बसवलं. त्यानंतर हा टायर उतारावरून खाली ढकलला. उतारामुळे टायर वेगाने खाली जाऊ लागला आणि त्यात बसलेल्या तरुणाचीही अवस्था खराब होऊ लागली. तरूणांना वाटलं की टायर सरळ मार्गावर जाईल आणि काही अंतरावर जाताच ते तो थांबवतील. मात्र, घडलं काहीतरी भलतंच.
advertisement
काही वेळ टायर सरळ जात राहिला. मात्र, मध्येच तो उजव्या बाजूला असलेल्या दरीकडे वळला आणि नंतर उतारामुळे वेगाने पळू लागला. त्यामुळे त्यात बसलेली व्यक्तीही बराच वेळ गोल गोल फिरत राहिली. मित्राला सुखरूप वाचवण्यासाठी तरुणाने टायर पकडण्यासाठी वेगाने धाव घेतली. मात्र त्याला टायर पकडता आला नाही. आता त्या व्यक्तीचं पुढे काय झालं हे माहीत नसलं तरी हा खेळ पुन्हा खेळण्याचं धाडस त्यांच्यापैकी कोणीही परत करणार नाही, हे नक्की म्हणता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2023 11:18 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video: मस्ती म्हणून मित्राला टायरमध्ये बसवून उतारावरुन ढकललं; नंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं