VIDEO: साथीदाराला सिंहाच्या तावडीतून वाचवण्यासाठी सगळे हायना एकत्र आले, शेवटी डावच पालटला
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही हायना मजेत त्यांची शिकार खात आहेत. यावेळी त्यांना काहीतरी आवाज ऐकू येतो आणि अचानक एक सिंह त्यांच्या समोर येऊन उभा राहातो
नवी दिल्ली 31 ऑगस्ट : जंगलात प्राण्यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत असते. खरं तर जंगलाच्या आत एकच नियम आहे. इथे जे लढतात तेच इथे जिंकतात. नाहीतर उद्याचा सूर्य बघायला मिळेलच याची शाश्वती नाही. हे दाखवणारे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की मैत्रीचा फॉर्म्युला फक्त माणसांच्या जगातच नाही तर प्राण्यांच्या जगातही काम करतो.
माणूस ज्याप्रकारे आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो, त्याचप्रमाणे प्राणीही संकट आल्यावर एकत्र येऊन त्याला सामोरे जातात आणि संकट संपेपर्यंत एकमेकांची साथ सोडत नाहीत. मग त्यात स्वतःचा जीव जाण्याची भीती का असेना. हे आम्ही म्हणत नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ याचा पुरावा देत आहे. जिथे सिंह हायनाला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेव्हाच असं काहीतरी घडतं, ज्यामुळे संपूर्ण खेळ उलटतो.
advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही हायना मजेत त्यांची शिकार खात आहेत. यावेळी त्यांना काहीतरी आवाज ऐकू येतो आणि अचानक एक सिंह त्यांच्या समोर येऊन उभा राहातो. जीव वाचवण्यासाठी सगळे हायना तिथून पळून जातात पण एक हायना तिथेच राहातो. ज्याची शिकार करण्यासाठी सिंह त्याच्यावर झेप घेतो. हे दृश्य पाहताच इतर हायना त्याला वाचवण्यासाठी येतात आणि सिंहाला हार मानून तिथून पळून जावं लागतं आणि त्यांच्या साथीदाराचा जीव वाचतो. हा व्हिडिओ YouTube वर लेटेस्ट साईटिंग्ज नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे.
advertisement
काही तासांपूर्वीच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून तो एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 1300 हून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून 'मैत्री अशी असावी' असं लोक म्हणत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, खरं सांगायचं तर, हायनांना नेहमी कमी लेखलं जातं. त्यांचा नेहमीच द्वेष केला जातो. मात्र, ते एकमेकांची किती काळजी घेतात हे पाहून छान वाटलं. दुसर्याने कमेंट केली, हायना खूप हुशार आहेत. ते सिंहाला खूप घाबरत असले तरी, त्यांना माहित आहे की ते एकत्रितपणे कोणालाही पराभूत करू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2023 10:40 AM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO: साथीदाराला सिंहाच्या तावडीतून वाचवण्यासाठी सगळे हायना एकत्र आले, शेवटी डावच पालटला