विराट-रोहित पुन्हा दिसणार नाहीत... ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर शेवटच्या बॉलला ढसाढसा रडला, 48 तासांनी समोर आला Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा शेवटचा सामना खेळले. या सामन्यात दोघांनाही शेवटचं बॅटिंग करताना पाहताना ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरला अश्रू अनावर झाले.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली 3 वनडे सामन्यांची मालिका संपली आहे. सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अविश्वसनीय खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तब्बल 7 महिन्यांनंतर विराट आणि रोहित टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पुन्हा एकदा दिसले. रोहित शर्माने नाबाद शतक तर विराट कोहलीने नाबाद अर्धशतक करून भारताला सहज विजय मिळवून दिला. भारताने सीरिज गमावली असली, तरी शेवटची मॅच जिंकून टीमने व्हाईट वॉशची नामुष्की टाळली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोघंही त्यांचा शेवटचा सामना खेळले, मॅच संपल्यानंतरही विराट आणि रोहितने हा आपला ऑस्ट्रेलियामधला शेवटचा सामना असेल, असेच संकेत दिले. रोहित आणि विराटची बॅटिंग बघत असताना ऑस्ट्रेलियाचा कॉमेंटेटर भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. विराट आणि रोहित यांना ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचं बॅटिंग करताना पाहून कॉमेंटेटरला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
It was Rohit Sharma and Virat Kohli’s last match in Australia, and one of the commentators started crying when they played the final ball... pic.twitter.com/8b78UZ4SPo
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) October 26, 2025
तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नाबाद 168 रनची पार्टनरशीप केली. रोहितने नाबाद 121 रनची आणि विराटने नाबाद 74 रनची खेळी केली. या भावनिक क्षणाने फक्त प्रेक्षकच नाही तर कॉमेंटेटरही भारावले. सोशल मीडियावर सेन क्रिकेट नावाच्या पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरच्या डोळ्यात रोहित-विराटला पाहून अश्रू दिसत आहेत. रोहित-विराटची ऑस्ट्रेलियामधील ही शेवटची वनडे असू शकते, हे सांगताना कॉमेंटेटर भावुक झाला.
advertisement
रोहित-विराट पुन्हा कधी दिसणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर आता रोहित आणि विराट महिन्याभरानंतर मैदानात उतरणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 30 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 30 नोव्हेंबर 2025- रांची
दुसरी वनडे- 3 डिसेंबर 2025- नागपूर
तिसरी वनडे- 6 डिसेंबर 2025- विशाखापट्टणम
advertisement
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी रांचीचा सामना खास ठरू शकतो, कारण बऱ्याच काळानंतर हे दोघेही भारतामध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर भारत घरच्याच मैदानात न्यूझीलंडविरुद्धही 3 वनडे मॅचची सीरिज खेळेल, तेव्हाही विराट-रोहितला पाहण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 7:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराट-रोहित पुन्हा दिसणार नाहीत... ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर शेवटच्या बॉलला ढसाढसा रडला, 48 तासांनी समोर आला Video


