मुंबई : मित्रांसोबत मद्यपार्टी करणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. यंदाच्या दसऱ्याच्या दिनी ड्राय डे अर्थात मद्य विक्री बंद असणार आहे. हा ड्राय डे दसरा आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने असणार आहे. या ऑक्टोबर महिन्यात मद्य प्रेमींसाठी किती दिवस ड्राय डे असणार याची माहिती जाणून घ्या.
advertisement
ड्राय डेच्या दिवशी दारुची दुकाने बंद राहणार आहेत. त्याशिवाय, बारदेखील बंद असणार आहेत. रेस्टोरंट्स आणि बारमध्येही मद्य मिळणार नाही. फक्त जेवणाचे पदार्थ सर्व्ह केली जातील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाचे पथक कारवाई देखील करते. भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी ड्राय डे साजरा केला जातो.
भारतामध्ये ड्राय डेची अंमलबजावणी राज्यनिहाय केली जाते. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सण-उत्सवांनुसार दारूबंदीचे दिवस निश्चित केले जातात. साधारणतः 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबरसारख्या राष्ट्रीय दिनी सर्व राज्यांत मद्य विक्रीवर बंदी असते. महाराष्ट्रात यंदा ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती आणि दसऱ्याच्या दिवशी ड्राय डे पाळला जाणार आहे.
दारूबंदीच्या दिवशी दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. अनेकजण या दिवसांपूर्वीच 'स्टॉक' करून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ड्राय डेच्या आधी दारूच्या दुकानांमध्ये खरेदीचा ओघ वाढताना दिसतो.
महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात कधी असणार ड्राय डे?
महाराष्ट्रात या महिन्यात दोनच दिवस ड्राय डे असणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने ड्राय डे असणार आहे. तर, 8 ऑक्टोबर रोजी दारुबंदी सप्ताह असल्याने ड्राय डे असणार आहे. त्याशिवाय, दिवाळी अथवा इतर दिवशी ड्राय डे नसणार. त्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यातच थेट ड्राय डे असणार आहे. त्यामुळे सध्या तरी मद्यप्रेमींना मोठी चिंता करण्याचे कारण नाही.