पण एका सर्पमित्रासोबत खूपच हृदयद्रावक घटना घडली आहे. तो सापाचा रेस्क्यू करत असताना सापाने त्याला दंश केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला साधासूधा नाही तर किंग कोब्राने दंश केला होता.
हा सर्पमित्र गोंदियाच्या फुलचुर येथील आहे, त्याने आतापर्यंत शेकडो सापांना जीवनदान दिलं आहे, पण कोबराच्या दंशामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
advertisement
सुनील नागपुरे (४४) असं त्या सर्पमित्राचं नाव आहे. विषारी कोबरा सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया शहरालगत असलेल्या फुलचूर येथील सर्पमित्र सुनील नागपूर हे सापांना पकडून जीवनदान देण्याचे काम करत होते. पण सोमवारी रात्री गोंदियाच्या कारंजा येथे एका घरी साप निघाल्याची माहिती त्यांना मिळाली असता सापाचा रेस्क्यू करण्याकरिता गेले होते.
दरम्यान कोब्रा सापाचा रेस्क्यू केल्यानंतर त्याला प्लास्टिकचे गोणीमध्ये टाकत असताना सुनील नागपुरे यांना सापाने दंश केला. साप गोणीतून बाहेर फिरला आणि त्यांच्या हाताला दंश केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, जो खरोखरंच धक्कादायकल आहे. त्यांना तात्काळ गोंदिया शहरातील केटीएस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना शासना कडून आर्थिक मदत करावी असे स्थानिक नागरिक करत आहेत.
