TRENDING:

'आपल्या लोकांसोबत राहा' कर्जतमध्ये उभारली जातेय हलाल टाऊनशिप, राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने सरकारकडे मागितला रिपोर्ट!

Last Updated:

कर्जतमध्ये धार्मिक आधारावर टाउनशिपचे बांधकाम करून मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याची तक्रार राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहन जाधव, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

कर्जत : मुंबई आणि उपनगरामध्ये सध्या फ्लॅटच्या किंमती गगनाला भिडल्या आहे. फ्लॅट घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे कालपर्यंत डोंबिवली कल्याण हा पर्याय होता. आता कर्जत आणि कसारापर्यंत इमारती उभारल्या जात आहे. अशातच कर्जतमध्ये मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र्य टाऊनशिप उभारली जात आहे. त्याबद्दलची जाहिरात व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.  कर्जतमध्ये धार्मिक आधारावर टाउनशिपचे बांधकाम करून मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याची तक्रार राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे.

advertisement

रायगड जिल्ह्वातील कर्जतमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जतमधील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका जागेत धर्मावर आधारित टाऊनशीप उभी राहात आहे. या टाऊनशिपबद्दल सोशल मीडियावर जाहिरातही केली जात आहे. या टाऊनशिपमुळे धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याची भावना असल्याची माहिती आणि  तक्रारदाराने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.

advertisement

त्यानंतर या तक्राराची दखल  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. या प्रकरणाची  गंभीर दखल घेत राज्य शासनाकडे याबाबतीत अहवाल मागितल्याची माहिती मिळत आहे. हलाल लाईफस्टाईल टाऊनशीप या नावाने ही टाऊनशीप उभी राहत असून, धार्मिक आधारावर विभाजन आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी ही स्वतंत्र टाऊनशीप उभारली जात असल्याची माहिती तक्रारदार याने दिली आहे. सुरक्षा आणि सामाजिक हिताचं कारण देतही या टाऊनशीपला विरोध करण्यात आला होता. तरीही ही टाउनशिप उभी राहत आहे. यामुळे या इमारतीवर कशी कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

advertisement

'राज्य सरकारने कारवाई करावी'

एकाच समाजासाठी घरं बांधली जात असून तशी जाहिरात केली जात आहे, हे संविधानाला चॅलेंज केलं जात आहे. अशा प्रकारे कुणी जाहिरात करत असेल तर कारवाई झाली पाहिजे. धर्माच्या आधारावर असं कुणी करत असेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप प्रवक्त्यांनी केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आपल्या लोकांसोबत राहा' कर्जतमध्ये उभारली जातेय हलाल टाऊनशिप, राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने सरकारकडे मागितला रिपोर्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल