कार्यालयात संशयाचे वातावरण
गेल्या दोन दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांना कार्यालयाच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रवेशद्वारापाशी आणि आवारातील झाडांखाली हळद-कुंकू लावलेले लिंबू दिसून आले. एरवी अशा गोष्टी धार्मिक कार्यांमध्ये दिसतात, परंतु सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः ग्रामपंचायत कार्यालयात अशा वस्तू आढळल्याने लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.
या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ही चर्चा केवळ हलकर्णीपुरती मर्यादित न राहता आसपासच्या गावांमध्येही पसरली आहे. या घटनेविषयी ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे. कोणीतरी मुद्दाम हा प्रकार केला आहे की यामागे काहीतरी वेगळे कारण आहे, यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
राजकीय संघर्षाला वेगळे वळण
हलकर्णी ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच ही घटना घडल्यामुळे राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात आता 'जादूटोणा' आणि 'करणी' यांसारख्या गोष्टींची भर पडली आहे. यामुळे गावातील राजकीय संघर्ष आणखीन रंगतदार होण्याची शक्यता आहे. या गूढ घटनेमागचं सत्य काय आहे, हे लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा : 'कोल्हापूर चप्पल' आता 'मेक इन वुमन'! महिला बचत गटांना मिळणार 1.5 कोटींचा निधी, शासनाचा मोठा निर्णय
हे ही वाचा : नवरात्रीत कोल्हापूरला भेट देताय? जाणून घ्या ‘नो एंट्री’पासून पार्किंगपर्यंत सर्व नियम, नाहीतर होईल मोठी अडचण!