यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच विधीमंडाळातील एका मोठ्या पदावरील व्यक्तीने केलेल्या शिफारशीवरून योगेश कदमांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला, असा खळबळजनक खुलासा रामदास कदम यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीचं नाव योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे, अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली.
advertisement
घायवळला शस्त्र परवाना देण्याबाबत रामदास कदम म्हणाले, "मी गृहराज्यमंत्री होतो. गृहराज्यमंत्र्याला शस्त्र परवाने देण्याचे अधिकार असतात. ज्याच्यावर कुठलीही केस नाही. एखादा शिक्षक असेल बिल्डर असेल... कोर्टाने त्याला क्लीन चीट दिली असेल, तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतात. तुला (अनिल परब) आणि तुझ्या बापाला विचारून निर्णय घेतला जाणार नाही.
"आणखी एक गोष्ट मी मुद्दाम सांगतोय. मला आणखी खोलात जायचं नाहीये. योगेश कदम यांनी जो त्यांनी निर्णय घेतला आहे. तो निर्णय विधीमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या, मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीच्या शिफारसीनुसार घेतला आहे. मला आता नाव घ्यायचं नाही. योगेश कदमांनी त्याचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. ती मोठी व्यक्ती आहे. विधीमंडळात उच्च आसनावर बसणारी व्यक्ती आहे. मी त्यांचं नाव घेणार नुाही, अशा व्यक्तीने सांगितल्यावर त्यांनी शिफारस केल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे," असंही रामदास कदम म्हणाले.