कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील 'वसंत लॉन्स' येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात त्यांच्या लेकीची मंगल कार्यालयात शाही एन्ट्री… गाड्यांचा मोठा ताफा… अंगावरचे कपडे, ओपन जिप आणि मुलीचा गाडीच्या बाहेर येत तो शाही थाट चर्चेचा विषय बनला. मुलीच्या कपड्यांवर टीका केल्याने इंदुरीकर महाराज प्रचंड संतापले आहे. त्यांनी टीका करणाऱ्यांचा चांगला समाचार तर घेतला पण त्याचबरोबर दु:खी झाल्याने त्यांनी तीन दशकाची कीर्तन सेवा देखील थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या विचारत असल्याने इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत आले.
advertisement
टीकाकरांना काय उत्तर दिले?
मुलीच्या कपड्यांवर टीका करणाऱ्यांना इंदुरीकर महाराज यांनी चांगलेच झापले असून त्यांची अक्कल देखील काढली. इंदुरीकर म्हणाले, आता लोकं इतके खाली गेले की आता माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर बोलत आहे. एवढं बोलत आहे ती माझं जगणं मुश्कील केलं आहे. साखरपुड्यासाठी आपल्याकडे मुलीला कपडे कोण घेतो... मुलीचा बाप घेतो की मुलाकडचे घेतात... हे तुम्हीच सांगा, साखरपुड्यासाठी कपडे नवऱ्याकडचे आणतात एवढी अक्कल पाहिजे. पण आता ते माझ्या लेकीवर बोलत आहे... लोकं किती नालायक असावा पण किती याला मर्यादा आहे
कीर्तन सेवा बंद करणाऱ्यांवर इंदुरीकर महाराज काय म्हणाले?
मला लावा ओ घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. आता मी कंटाळलो आता मी क्लिप दोन ते तीन दिवसात टाकणार आहे. तीस वर्षात मी सगळ्या टीका सहन केल्या पण आता माझ्या घरावर आलेत. माझ्यापर्यंत टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही, त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे, म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्य विचारात आहे.
लाखो रुपयांचा खर्च सध्या चर्चेचा आणि टीकेचा
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे. इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमातील काही चांगल्या गोष्टींवर लक्ष वेधले असले, तरी त्यांच्या उपदेशाच्या विपरीत साखरपुड्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला.
