जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोरस फाट्याजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. दोन आयशर वाहनांची एकमेकांना धडक बसल्याची ही घटना आहे. या अपघातात आयशर चालक सागर ताराचंद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोरस फाट्याजवळ दोन आयशर वाहनांची भीषण धडक होऊन मागील वाहनाचा चालक सागर ताराचंद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला पुढे जाणाऱ्या आयशरला मागून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे मागच्या आयशर वाहनात असलेल्या सागर चव्हाण या जागीच मृत्यू झाला आहे. तर पुढे असलेल्या आयशरलाही त्याच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला धडक बसली आहे. त्यामुळे एकप्रकारे हा विचित्रच अपघात घडला आहे.
advertisement
विशेष म्हणजे या अपघातात एक जिवितहानी झाली आहे. त्याचबरोबर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या या अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान या अपघातानंतर पुढील आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे.या घटनेचा अधिकचा तपास सूरू आहे.