विकास रामलाल पावरा सोलंकी (वय 30), सुमन विकास पावरा (वय 23), पवन विकास पावरा (वय 4), कतल विकास पावरा (वय 3) आणि विकास पावरा यांची 65 वर्षीय सासू अशी मृतांची नावे असून मृत शेतमजूर कुटुंब हे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार येथील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान मृत कुटुंबांचे नातेवाईक हे मध्य प्रदेशातून जळगावकडे येण्यास निघाले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
मृतदेह नेताना रुग्णवाहिका पडली बंद!
मयत पाच जणांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रवाना केले. मात्र मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याने अखेर दुसऱ्या रुग्णवाहिकेला बंद पडलेली रुग्णवाहिका बांधून मृतदेह असलेली रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात आणण्यात आली. बंद पडलेली रुग्णवाहिका एका खाजगी संस्थेची असल्याची माहिती समोर येत आहे.