नियुक्तीचा आदेश खरा भासावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या, तसेच आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याही बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचे समोर आले आहे. बनावट आदेशाबद्दल पडताळणी केल्यानंतर तो बनावट आदेश असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कैलास सुशीर (रा. भुसावळ) आणि शोभा शिरसाठ (रा. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
या गुन्ह्यात रॅकेट असल्याचा संशय असून बनावट शिक्के कुठे आणि कसे बनवले याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींनी यापूर्वीही अशा पद्धतीने बनावट नियुक्तीचे आदेश बनवले का? वापरले का याबाबतही तपास केला जात , अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.