मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जाफराबादच्या दिशेने भरधाव कार निघाली होती. यावेळी भरधाव कारने गाडेगव्हाण फाट्यावर पादचाऱ्याला जोराची धडक दिली.या अपघातानंतर कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि थेट काही अंतरावर असलेल्या 80 फुट खोल विहिरीत जाऊन कोसळली होती. जालना जिल्ह्यातल्या राजूर-जाफराबाद या मुख्य मार्गावरील गाडेगव्हाण फाट्यावर भीषण अपघात झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली.मात्र तोपर्यंत पूर्ण गाडी पाण्यात बुडाली होती.त्यामुळे स्थानिकांनी तत्काळ हसनाबाद पोलिसांना टेंभुर्णी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्याला सूरूवात केली होती. यावेळी तब्बल सात ते आठ तासानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
advertisement
दरम्यान या अपघातात मृत पावलेल्या नागरीकांमध्ये दोन महिलांचा व तीन पुरूषांचा समावेश आहे. 1)ज्ञानेश्वर भाऊसाहेब टकले,2)निर्मलाबाई सोपान डकले, 3)पदमाबई लक्ष्मण भांबीरे, 4) ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबीरे अशी या चार मृतांची नावे आहेत.तर पाचव्या मृत व्यक्तीचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सूरू आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टेंभूर्णी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे.या घटनेत आधी कार चालकाने पादचाऱ्याला धडक दिली त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे थेट कार विहिरित कोसळली होती.या कारमधून 5 जण प्रवास करत होते. या पाचही जणांची मृतदेह बाहेर काढण्यात आली आहे.तसेच पोस्टमार्टमसाठी या मृतदेहांना पाठवण्यात आले आहे. तसेच मृत व्यक्ती ही गेवरी गुंगे आणि कोपरडाके या दोन गावांतील असल्याची माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे.