जालना: छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर शहारे येतात. त्यांच्या पराक्रमाच्या यशाच्या आणि लढायांच्या गोष्टी ऐकूनच अनेक जण लहानाचे मोठे झाले. त्यामुळे शिवरायांच्या विचारांचा वारसा लाभलेली अनेक मुले देखील त्यांच्यासारखेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील शौर्य चंद पाटील याने देखील अशीच करामत करून दाखवली आहे. तीन वर्षाचा असताना पहिल्यांदा शिवनेरी मोहीम फत्ते करणाऱ्या शौर्यने अवघ्या सात वर्षाच्या वयात तब्बल 16 किल्ले सर केले आहेत. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे देखील नुकतेच त्याने सर केले.
advertisement
वयाच्या तिसऱ्या वर्षी शिवनेरी सर
बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील संजीवनी आणि रामेश्वर चंद या जोडप्यांना गिर्यारोहण करण्याची प्रचंड आवड आहे. हीच आवड त्यांचा मुलगा शौर्यमध्येदेखील आली. दोघांनी आपल्या मुलाला गिर्यारोहणाचे असे काही प्रशिक्षण दिले की, अवघ्या तिसऱ्या वर्षांत या मुलाने दाट धुके, वेगाने वाहणारा वारा, मुसळधार पावसात आई-वडिलांच्या साहाय्याने न थांबता प्रतिकूल परिस्थितीत शिवनेरी किल्ला गाठून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. पहिल्यांदा शिवनेरी मोहीम सर केली. त्यानंतर विविध किल्ले सर करत वयाच्या सहाव्या वर्षी कळसुबाई शिखर सर केले आहे. या वेळी शौर्यची मोठी बहीण सृष्टी देखील सहभगी असते.
रस्त्यावर झोपणाऱ्या गोर गरिबांना मायेची ऊब देणारा ‘ब्लॅंकेट दूत’; 3 वर्षांपासून राबतोय उपक्रम Video
सात वर्षांत 17 किल्ले सर केल्याचा मान
शौर्यचा जन्म 4 जानेवारी 2016 रोजी झाला असून वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याने शिवनेरी किल्ला गाठला. त्यानंतर मलंगगड, चौथ्या वर्षी देवगिरी किल्ला सर करून वयाच्या पाचव्या वर्षी रायगड आणि सहाव्यांदा कळसुबाई शिखर गाठले. त्यामुळे शौयनि आतापर्यंत रायगड, ठाणे कल्याण येथील मलंगगड, दुर्गाडी किल्ला, माहुली गड, भंडारगड, पळसगड, कोथळीगड/ पेठ किल्ला, जेजुरी गड, विकटगड, पेब किल्ला आदी 16 किल्ले आणि एक सर्वांत उंच कळसूबाई (1646 मीटर) शिखर सर केले आहे.
क्लार्क व्हायला गेला अन् बँक मॅनेजर झाला, कोरोनात नोकरी गमावलेल्या शेतकरी पुत्राची संघर्षगाथा, Video
मुलांनी शिवरायांचा इतिहास जाणून घ्य़ावा
मी वयाच्या तिसऱ्या वर्षी शिवनेरी हा पहिला किल्ला सर केला. माझे आई-वडील मला किल्ले चढायला घेऊन जायचे. आतापर्यंत मी 16 किल्ले आणि कळसुबाई शिखर अशी एकूण 17 गड किल्ले सर केले आहेत. माझ्या वयाच्या लहान मुलांना मी एवढेच सांगू इच्छितो की कार्टून आणि गेम मध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले सर करण्याचा छंद जोपासा. तसेच त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करा, असं शौर्य चंद याने सांगितलं.