TRENDING:

जालना शहरात आढळला बिबट्या?, CCTV मध्ये काय दिसलं, वनविभागाने केले हे महत्त्वाचं आवाहन

Last Updated:

30 जुलै रोजी जालना शहराला लागून असलेल्या वन विभाग परीक्षेत्रात विभक्त झालेले मृत हरण आढळले होते. या हरणाच्या शवविच्छेदनामध्ये रिपोर्टमध्ये हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याचे निष्पन्न झाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना : वाढलेल्या सिमेंट जंगलांमुळे हिंस्रप्रशु नागरी वस्तीमध्ये घुसल्याचे प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. छत्रपती संभाजी नगरमध्ये तर बिबट्याने मॉलमध्ये सैर केल्याचेही समोर आले होते. पण आता संभाजीनगरला लागूनच असलेल्या जालना शहरामध्येही 6 ऑगस्ट रोजी बिबट्या पाहायला मिळाला आहे. शहरातील शितल विहार कॉलनीमध्ये रात्री 2 वाजून 10 मिनिटांनी कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या आढळून आला. त्याचबरोबर याच भागामध्ये एक बकरी शीर आणि धड वेगळं असलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

30 जुलै रोजी जालना शहराला लागून असलेल्या वन विभाग परीक्षेत्रात विभक्त झालेले मृत हरण आढळले होते. या हरणाच्या शवविच्छेदनामध्ये रिपोर्टमध्ये हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जालना शहराच्या आसपास बिबट्या किंवा तत्सम हिंस्र प्राणी असल्याच्या वार्तांना वनविभागाने दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला प्राणी हा बिबट्याच असल्याची खात्री वन विभागाने केली.

advertisement

आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ, किंमत ऐकून थक्क व्हाल, पुण्यातून Local18 खास रिपोर्ट, VIDEO

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट रोजी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शीतल विहार कॉलनीची पाहणी केली. कॉलनीतील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज वन विभागाकडून तपासण्यात येणार आहेत. यादरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मृत अवस्थेतील शीर आणि धड वेगळ झालेले बकरीचे पिल्लू आढळले. तसेच काही प्राण्यांचे पायाचे ठसे देखील आढळले. या सर्व बाबींची वनविभाग तपासणी करणार आहे आणि यानंतरच अधिकृत माहिती देणार असल्याचे वन अधिकारी कैलास नागरगोजे यांनी सांगितले.

advertisement

Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..

तसेच शहराला लागून असलेल्या वनपरिक्षेत्रात जाण्यास नागरिकांना मागील 3 ते 4 दिवसांपासून बंदी घालण्यात आली आहे. हिंस्र प्राण्याने हरणाची शिकार केल्याची घटना घडल्यानंतर वन विभागाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. वन विभाग बिबट्याच्या मागावर असून लवकरच याबाबतची स्पष्टता येईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता रात्री-अपरात्री घराबाहेर पडणे टाळावे तसेच एकटे फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
जालना शहरात आढळला बिबट्या?, CCTV मध्ये काय दिसलं, वनविभागाने केले हे महत्त्वाचं आवाहन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल