आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ, किंमत ऐकून थक्क व्हाल, पुण्यातून Local18 खास रिपोर्ट, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. शहराच्या विविध भागांमध्ये लहान-मोठ्या राखी विक्रीचे दुकाने सजल्याचे दिसत आहे. परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरावांना वेळेत राखी पोचण्यासाठी आत्तापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : रक्षाबंधन हा सण एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो आणि यावर्षी हा सण आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत आहे. बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला पवित्र सण रक्षाबंधन साजरा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यासह पारंपारिक गोंडा राखी बाजारात विक्रीस दाखल झाली आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
महिलांकडून राख्यांच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. शहराच्या विविध भागांमध्ये लहान-मोठ्या राखी विक्रीचे दुकाने सजल्याचे दिसत आहे. परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरावांना वेळेत राखी पोचण्यासाठी आत्तापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे.
advertisement
दुसरीकडे व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रामराखी देखील आकर्षण ठरत आहे. या वर्षी लायटिंग राखीमध्ये स्पिनर लायटिंग राखी आणि कपल राखी अर्थात महिला पुरुष दोघांसाठीही असलेली राख्या बाजारात आल्या आहेत. स्पिनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लायटिंग राखीची आकर्षकता वाढवते.
advertisement
या राख्यांची किंमत 2 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहे. कपल राखीमध्ये दोन राख्यांपैकी महिलांना सिंगल दोऱ्याची अर्थात बांगड्यांना बांधता येईल, अशी लट राखी आणि तशीच बनावट असलेली डबल दोऱ्याची पुरुषांसाठी राखी यंदाचे नावीन्य आहे.
advertisement
चिमुकल्यांसाठी खास राख्या उपलब्ध -
advertisement
चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत, अशी माहिती राखी व्यावसायिक अमित बागमार यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 07, 2024 4:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आकर्षक राख्यांनी सजली बाजारपेठ, किंमत ऐकून थक्क व्हाल, पुण्यातून Local18 खास रिपोर्ट, VIDEO