जालना : प्रत्येक जण आपला वाढदिवस विशेष अशा पद्धतीने साजरा करत असतो. हल्ली प्राण्यांचे वाढदिवसही अनेक जण साजरे करतात. त्यात वृक्षांचा वाढदिवस साजरा झाल्याचे क्वचितच ऐकायला मिळते. मात्र, जालना शहरातील समाज कल्याण विभागाने झाडांचा आठवा वाढदिवस साजरा केला आहे.
तत्कालीन समाज कल्याण आयुक्त बलभीम शिंदे यांच्या पुढाकाराने आयुक्तालय परिसरात 3 हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. या झाडांची निगा राखता यावी व त्यांच्या वाढीचा आनंद लुटता यावा, म्हणून वाढदिवसाची संकल्पना पुढे आली. मागील 8 वर्षांपासून दरवर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा होत आहे. यावर्षी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केक कापून उत्साहात झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यामागची संकल्पना नेमकी काय होती, हे जाणून घेऊयात.
advertisement
Photos : सर्पमित्रांनी सांगितलं, सापांना दूध पाजणं योग्य कि अयोग्य?, महत्त्वाची माहिती..
2016 मध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जालना यांनी आयुक्तालय परिसरामध्ये वेगवेगळी झाडे लावण्याची संकल्पना मांडली. सर्व कर्मचाऱ्यांच्या सहमतीने आयुक्तालय परिसरामध्ये तब्बल 3 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये आवळा, चिंच, वड, पिंपळ, जांभूळ इत्यादी वृक्ष लावण्यात आली. यानंतर झाडे लावून झाल्यावर वर्षपूर्तीच्या वेळी झाडांची निगा व्यवस्थित राखता यावी आणि झाडांच्या वाढीचा आनंद घेता यावा म्हणून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.
त्यानुसार पहिल्याच वर्षी झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर ही परंपरा मागील 7 वर्षांपासून कायम ठेवण्यात आली असून यंदा आठव्या वर्षीदेखील या 3 हजार वृक्षांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे 2018 मध्ये असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये झाडे वाचवणे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, आयुक्तालयातील कर्मचारी टंकलेखक संतोष आडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांकडून एक हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत वर्गणी गोळा करून 90 हजार रुपये खर्च होऊन बोअरवेल केला.
Youtube पाहून फटाके बनवण्याचा केला प्रयत्न, 5 मुलांसोबत घडली धक्कादायक घटना
बोअरवेल केल्यावर झाडांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने ही झाडे आता बहरदार दिसत आहेत. समाज कल्याण आयुक्तालय परिसर या झाडांनी बहरून गेला असून येणाऱ्या जाणाऱ्यांची देखील लक्ष वेधत आहे. सगळ्यांच्या सहकार्याने ही झाडे मोठी झाल्याचा आनंद असल्याची भावना कर्मचारी संतोष आडे यांनी व्यक्त केली. झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची ही परंपरा अशीच कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.