कोल्हापूर : आजकाल वेगवेगळे पदार्थ आपल्याला सर्वत्र खायला मिळत आहेत. कोल्हापुरातही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला स्ट्रीट फूडच्या रूपात पाहायला मिळत आहेत. यातच कोल्हापुरच्या एका तरुणाने महागड्या रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये मिळणारे काही युनिक पदार्थ आपल्या कॅफे व्हॅनमध्ये विकण्यास सुरुवात केली. साधरण वर्षभरापूर्वी त्याने हा व्यवसाय सुरू केला आणि अगदी वर्षभरात कोल्हापूरकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला.
advertisement
अभिषेक टाकळे असे या व्यक्तीचे नाव आहे. अभिषेक टाकळे आणि त्याच्या पत्नीने कोल्हापूरच्या रंकाळा तलावाशेजारी कॅफे बेलपेपर नावाने एक कॅफे व्हॅन सुरू केली. सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांच्याकडे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये वेगळेपण जपले. सध्या त्यांच्याकडे मिळणारे वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज केक, मिल्क केक, आणि स्लायडर या डिशना कोल्हापूरकरांनी पसंती दर्शवली आहे. तर सीजन नुसार लंडन स्ट्रॉबेरी चॉकलेट, मॅंगो सागो अशा हंगामी डिशेसही खूप आवडीने खवय्यांनी चाखल्या आहेत, असे अभिषेक सांगतो.
शिक्षण फक्त 7 वी पास, परिस्थितीवर केली मात, उभारला मोठा उद्योग, आज हजारो कर्मचारी कामाला!
कशी झाली सुरुवात?
हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेला अभिषेक टाकळे हा तरुण आपल्या बायकोसह पुण्यातील जेडब्ल्यू मॅरियट या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 3 वर्षे काम करत होता. कोरोनाकाळात स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा विचार केला होता. त्यातही एखाद्या गाळ्यापेक्षा फूड ट्रकची संकल्पना आजकाल ट्रेंडिंगवर आणि परवडणारी असल्याने त्यांनी कॅफे व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
काय आहे कॅफे व्हॅनची स्पेशालिटी?
अभिषेककडे सर्व नवीन आणि युनिक पदार्थ मिळतात. चीज केक म्हणजे चीज क्रीम पासून बनवलेले केक. तर एखाद्या मिनी बर्गर प्रमाणेच स्लायडर हा पदार्थ असतो. फक्त त्यामध्ये बर्गरमध्ये असते तशी पॅटी न वापरता पॅटीमधील भाजी आणि कॉल्सलाव यांचे मिश्रण करुन ग्राहकाच्या पसंतीचा फ्लेवर बनवून दिला जातो. त्याच्याकडे 16 प्रकारचे चीज केकचे फ्लेवर आणि 6 प्रकारचे व्हेज-नॉनव्हेज स्लायडर मिळतात. तसेच कोल्हापुरात इतर कुणाकडेच न मिळणाऱ्या मिल्क केक आणि सीजन नुसार लंडन स्ट्रॉबेरी चॉकलेट, मॅंगो सागो अशा नवनवीन डिश देखील कोल्हापूरकरांना खायला देत असल्याचे अभिषेकने सांगितले.
पावसाचा जोर वाढला! राज्याच्या ‘या’ भागात होणार अति मुसळधार पाऊस, तुमच्या भागात अशी असणार परिस्थिती
साधारण 6 लाखांचा फूड ट्रक -
कॅफेसाठीचा फूड ट्रक अभिषेकने स्वतःला हवा तसा बनवून घेतला आहे. ग्राहकांसाठी ट्रकवर बसण्याची सोय न करता त्याने बाहेर स्टूल ठेवले आहेत. अशाप्रकारे ट्रकमध्ये चालणारा हा कोल्हापुरातील पहिलाच कॅफे आहे. हा फूड ट्रक अभिषेकने त्याच्या वडिलांच्या संकल्पनेनुसार त्यांच्याकडूनच बनवून घेतला होता. कॅफेच्या किचनमधील सर्व सोयींनी युक्त असा हा फूड ट्रक बनवायला जवळपास 6 लाख रुपयांचा खर्च आल्याची माहिती अभिषेकने दिली आहे.
दरम्यान, रेस्टॉरंट स्टाईलचे चीज केक आणि स्लायडर असे युनिक पदार्थ खायचे असतील, तर रंकाळा परिसरात रोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू असणाऱ्या कॅफे बेलपेपर या ठिकाणी खवय्ये गर्दी करत असतात.
पत्ता : कॅफे बेलपेपर, देवकर पाणंद पेट्रोल पंपाजवळ, रंकाळा तलावासमोर, राधानगरी रोड, कोल्हापूर - 416012





