नेमकं काय घडलं?
दुपारी एकच्या दरम्यानची वेळ सचिन खवळे नावाचा मटका बुकी चालक आत्मदहनासाठी पोलीस ठाण्यासमोर येत असल्याची माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोलीस सतर्क झाले होते. सगळे बुकी चालू आहेत मग माझी एकट्याचीच बंद का? पोलिसांनी मटका मालकाला सांगायला नको का? दुसऱ्या एजंटांचं ऐकून पोलीस मला एकट्यालाच का टार्गेट करतात, असं म्हणत एक अपंग बुकी चालक सचिन विनायक खवळे याने कळे पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, अपंग असलेला सचिन खवळे पेट्रोलची बाटली घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याचे सीसीटीव्हीत दिसताच अंकुश शेलार, सुनील खाडे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सचिनच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेत त्याला ताब्यात घेतले. शासकीय कर्तव्य बजावण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलीस ठाणे परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकारानंतर पोलिसांचीही भंबेरी उडाली होती.
advertisement
पोलीस ठाण्यात मटका व्यवसायिकांची गर्दी
सगळ्या बुकी चालू आहेत मग माझी एकट्याचीच बंद का असं म्हणत सचिन खवळे याने कळे पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. आणि जशी माहिती मिळेल तसे आजूबाजूचे मटका व्यवसायिक पोलीस ठाण्यात गर्दी करू लागले. पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात मटका व्यवसायिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. त्यापैकी काही व्यवसायिकांनी तू उद्यापासूनच बुकी सुरू कर अशी चक्क पोलीस ठाण्यातच सचिनची समजूत काढत होते. यावेळी रडत रडत सचिन खवळे याने पेट्रोल सदृश्य पदार्थ प्लॅस्टिकच्या बाटलीतून घेवून येऊन माझ्यावर पोलिसांनी जुगाराच्या केसेस केल्या आहेत. येथून पुढे त्यांनी माझ्यावर जुगाराच्या केसेस करू नयेत. नाहीतर मी आत्मदहन करीन, असं म्हणत होता.






