सध्याच्या महागाईच्या काळात जगताना सामान्य नागरिकाला कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करावा लागतो. त्यातच कित्येकांना सणांचा राजा मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणावेळी देखील आपल्या इच्छा, आपल्या मुलांच्या इच्छा मारुनच सण साजरा करावा लागतो. त्यामुळेच कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट या संस्थेने गेली 9 वर्षांपासून गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. तर संस्थेकडून फक्त 200 कुटुंबांवरुन सुरुवात करुन यंदा 1200 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला आहे.
advertisement
करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांना देवीचा भोजनप्रसाद मिळावा, या अपेक्षेने सन 2008 साली श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टची स्थापना केली गेली. सामाजिक बांधिलकीची विधायक दृष्टी डोळ्यासमोर ठेवत आम्ही सातत्याने कार्यरत राहिलो. मदत करणाऱ्या हजारो दानशुरांनी आमच्या कामाला भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आमच्या कार्याचा मोठा वटवृक्ष झाला असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.
आज धनत्रयोदशी, या वस्तू चुकूनही खरेदी करू नका, शनिदेव होतील नाराज, काय खरेदी कराल?
गेली 15 वर्षे ट्रस्टतर्फे अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या रोज अंदाजे 3000 ते 5000 भाविकांना चविष्ट आणि सात्विक भोजनप्रसाद दिला जातो. श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या माध्यमातून जवळपास 800 लोकांच्या निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात येते. लोकांच्या विश्वास पात्र ठरलेली धनलक्ष्मी नागरी पतसंस्था देखील चालवली जाते. याच सर्व उपक्रमांना साजेसा असाच उपक्रम म्हणजे दीपावली निमित्त फराळ वाटप उपक्रम आहे, अशी मेवेकरी यांनी माहिती दिली.
तर फराळ मिळाल्यानंतर लाभार्थी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद साफ दिसत होता. या फराळामुळे आमची ही दिवाळी यंदा गोड होणार मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील अन्नछत्र तर्फे आम्हाला असा फराळ मिळाला त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो अशा भावना अथर्व खामकर याने व्यक्त केल्या.
100 रुपयांपासून खरेदी करा दिवाळीसाठी लेटेस्ट पॅटर्न ब्लाऊज; पुण्यात ‘इथं’ आहे ठिकाण
यंदा 1200 कुटुंबांना फराळ
या वर्षी अशा 1200 कुटुंबांना प्रत्येकी 3 किलो दिवाळी फराळ दिला गेला. म्हणजेच एकूण 3600 किलो फराळाचे यंदा वाटप करण्यात आले आहे. या फराळाच्या पदार्थात बुंदीचे लाडू, चकली, शेव, चिवडा, शंकरपाळी इत्यादी पदार्थांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी बाजार मुल्याप्रमाणे 10 लाखाहुन अधिक खर्च करावा लागतो. दरम्यान सर्व जिन्नस अन्नछत्रामध्ये बनविले असून सर्व पदार्थांची लॅबमध्ये तपासणीही केली जाते, असेही मेवेकरी यांनी सांगितले आहे.
दिवाळी म्हटले की फटाके आणि खूप मजा असते. मात्र फटक्यापासून होणारे प्रदुषण आणि कचरा यामुळे मोठे नुकसान होते. शिवाय याच पैशांमधून आपण गरजू मुलांना किंवा व्यक्तीला मदत केली तर त्यांना दिवाळीचा आनंद घेता येतो आणि आपला आनंद द्विगुणत होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी ही फटाके न फोडता, कचरा आणि प्रदूषण न करता स्वच्छ आणि आनंद देणारी साजरी करण्याचा निर्धार केला आहे.