कोण घेऊ शकते सहभाग?
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
PHOTO : कोल्हापूरच्या राजाचं थाटात आगमन; ढोलताश्या-डीजेच्या तालावर तरुणाईचा ठेका
कसा आणि कधीपर्यंत नोंदवावा सहभाग?
advertisement
हा पुरस्कार मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि. 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करता येतील.
असे होईल निरीक्षण..
या पुरस्काराच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली एक समिती नियुक्त करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या जिल्हयातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ही समिती गणेशोत्सव काळात भेट देईल. यावेळी भेटीदरम्यान गणेश मंडळांना या समितीला आपल्या कार्यक्रमाचे फोटो, अहवाल, व्हिडिओग्राफी सादर करावे लागतील.
महिनाभरापूर्वीच बाप्पाच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग, पाहा मार्केटमध्ये काय आहे खास?
अशी असतील बक्षिसे..
या स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरुन राज्यस्तरावर निवड होणाऱ्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुढे सन 2023 मध्ये राज्यातील पहिल्या 3 विजेत्या गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून अनुक्रमे 5 लाख रुपये, 2 लाख 50 हजार रुपये, 1 लाख रुपये अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सन 2023 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कार समितीचे अध्यक्ष संजय तेली यांनी दिली आहे.
या निकषांच्या आधारावर होईल निवड..
• पर्यावरणपूरक मूर्ती - 10 गुण,
• पर्यावरणपूरक सजावट (थर्माकोल व प्लास्टिक विरहित) -15 गुण
• ध्वनीप्रदूषण विरहीत वातावरण -5 गुण
• पाणी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन इ. समाज प्रबोधन/ सामाजिक सलोखा संदर्भात सजावट/ देखावा/ स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात/ छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा -20/25 गुण (देखाव्याप्रमाणे)
• गणेशोत्सव मंडळाने वर्षभरात रक्तदान शिबीर, गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, ॲम्ब्युलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इ. सामाजिक कार्य - 20 गुण
• शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थिंनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य इ. बाबत केलेले कार्य - 15 गुण
• महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इ. बाबत केलेले कार्य - 15 गुण
• पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा -10 गुण
• पारंपरिक / देशी खेळांच्या स्पर्धा- 10 गुण
• गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस 5 गुण)- 25 गुण