राधाकृष्ण मंडळाची स्थापना 1981 साली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली. त्यावेळी लहान प्रमाणात मांडव घालून सुरुवात झालेले राधाकृष्ण मंडळ आज भव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा करते. आत्तापर्यंत मंडळाने अनेक राजवाडे आणि मंदिराचे मोठमोठ्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना गणेशोत्सव काळात इथे आल्यानंतर अगदी खऱ्या ठिकाणी भेट दिल्यासारखे वाटत असते, असे मंडळाचे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी सांगितले.
advertisement
143 वर्ष जुने मंडळ बदलणार परंपरा, यंदा कोल्हापूरकरांना मिळणार खास पर्वणी
या मंडळाकडून सुरुवातीला मदुराईचे मीनाक्षी मंदिर, सर्वधर्म समभाव मंदिर, नटराज मंदिर, म्युझिक लाईट, हवा महल, अक्षरधाम मंदिर, इस्कॉन टेम्पल, बेंगलोर मधील आर्ट ऑफ लिविंगचे मंदिर, आंध्र मधील वेल्लोरचे गोल्डन टेम्पल, दिल्लीचे लोटस टेम्पल, जेजुरीचा खंडोबा, अमेरिकेतील डिज्नी वर्ल्ड, थायलंड मधील बुद्ध टेम्पल अशा विविध मंदिराच्या आणि राजवाड्यांच्या प्रतिकृती केलेल्या आहेत, असेही कपिल चव्हाण यांनी सांगितले आहे.
यंदा काय असणार आकर्षण?
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मंडळाकडून सर्व तयारी सूरु असून मंडळाचे यंदाचे 43 वे वर्ष आहे. यावेळी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती उभी केली जात आहे. या मंदिराचे काम गेले दोन महिने चालू असून 25 ते 30 कुशल कारागीर हे मंदिर बनवत आहेत, असे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माधव शुक्ल यांनी सांगितले आहे.
गणेश चतुर्थीसाठी फक्त 10 मिनिटात बनवा पनीर मलई मोदक, पाहा सोपी रेसिपी
कसं असेल केदारनाथ मंदिर ?
मंडळाकडून साकारण्यात येत असलेले केदारनाथ मंदिर हे भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराची उंची ही 50 फूट असणार आहे. तर 40 फूट रुंद आणि 80 फूट लांब असा मंदिराचा गाभारा असणार आहे. मंदिरात समोरून प्रवेश केल्यानंतर महादेवाची पिंड समोर पाहायला मिळेल. त्याच्या मागे गणपतीची उत्सवमूर्ती आणि प्रतिष्ठापना केलेली मुर्ती असणार आहे. तिथून दर्शन घेऊन पुढे डाव्या बाजूच्या दरवाज्यातून मंदिराच्या मागच्या बाजूला जाता येणार आहे. तिथे केदारनाथ मंदिराच्या मागे असणाऱ्या भीमशिळेचे देखील नागरिकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच पुढे जाऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून नागरिकांना बाहेर जाता येणार आहे.
गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मंडळामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गणेश याग, दूधाचा संततधार अभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखावा पहिला दिवसापासून चालू होत आहे, असेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.