कोल्हापूरच्या नागाळा पार्क परिसरात मूळचे सांगलीचे असणारे शिंदे कुटुंब सध्या कामानिमित्त राहत आहे. त्यांचा दीड वर्षांचा मुलगा अर्शित हा त्याच्या अद्भुत आकलन क्षमतेमुळे सर्वत्र चर्चेत येऊ लागला आहे. खरंतर इतक्या लहान वयात त्याला नीट बोलताही येत नाही. मात्र त्याला दाखवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी तो अगदी बरोबर ओळखतो. त्याच्या याच कामगिरीची दखल घेत चेन्नईच्या 'कलाम्स वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये त्याच्या नावाची नोंद झाली आहे. अर्शित हा त्याच्या या विश्वविक्रमामुळे आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस कीड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
advertisement
64 उमेदवार, 1200 मतदार; महाराष्ट्रातील या महाविद्यालयात झाली निवडणूक
लहानपणीच ओळखली बुद्धिमत्ता..
अर्शित हा अगदी लहानपणापासूनच हुशार असल्याचे आम्हाला जाणवत होते. त्यामुळेच मी आणि त्याच्या बाबांनी त्याची आकलन क्षमता पाहून त्याला सूर्यमाला, विविध प्राणी, पक्षी आदी विविध गोष्टींची ओळख करून दिली. यासाठी आम्ही फ्लॅश कार्ड्सचा वापर केला असे अर्शितची आई अमृता शिंदे यांनी सांगितले.
विश्वविक्रमासाठी ओळखल्या या गोष्टी..
अर्शित हा विविध गोष्टी कार्ड्सच्या माध्यमातून ओळखतो. या जागतिक विक्रमात आर्शितने शरीराचे 14 अवयव, सूर्यमाला, 18 फळे, 36 प्राणी-पक्षी, 15 महान व्यक्तिमत्त्वे, इंग्रजी अक्षरे, 9 प्राणीपक्षांचे आवाज आणि त्यांची कृती, 16 प्राणी पक्षाच्या सावल्या, 16 आशियाई आणि युरोपियन देशाचे ध्वज, 41 विविध वस्तू, 16 भाज्या, 9 भावना, 7 रंग आणि आकार, 4 ऋतू, 18 वाहने, 11 मदतनीस, 4 वाहतूकीचे मार्ग, 6 व्यायाम आणि योगासने प्रकार अर्शितने ओळखले आहेत.
ही दोस्ती तुटायची नाय.., 23 नंबरची खोली अन् मॅडी - नांगरे पाटील यांच्या मैत्रीचे भन्नाट किस्से
आश्चर्य, आनंद आणि कौतुक
दरम्यान, आता या छोट्या विक्रमवीराची एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस कीड म्हणून नोंद झाली असल्यामुळे घरच्या मंडळींसह मित्र परिवारात देखील आनंदाचे वातावरण आहे. तर फक्त दीड वर्षाच्या मुलाने साध्य केलेल्या या यशामुळे त्याच्या कामगिरीबद्दल आश्चर्य आणि कौतुकही दोन्ही भावना कोल्हापूरकरांमध्ये पाहायला मिळत आहेत.