TRENDING:

रिलमध्ये शिव्या दिल्यामुळे काय काय सहन करावं लागलं? अखेर नारू, बालाजी आणि विशाल आले समोर!

Last Updated:

आठवडाभरापूर्वी इचलकरंजीतील तिघा तरुणांना अश्लील विषय रिल तयार केल्याबद्दल समज देण्यात आली होती. या तिघा तरुणांकडूनच आपण या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी  
advertisement

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या आक्षेपार्ह रिल्स आणि पोस्ट्सच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. आठवडाभरापूर्वी इचलकरंजीतील तिघा तरुणांना अश्लील विषय रिल्स तयार केल्याबद्दल समज देण्यात आली होती. कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने विशाल बनगोडी, निवृत्ती परीट (नारू) आणि बालाजी डांगे या तिघा तरुणांना समज दिली. या तिघांनी समज दिल्यानंतर परत कधीही अश्लील विषय असलेले रिल्स बनवणार नसल्याचे कबुली देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एकंदरीतच, हे प्रकरण नेमकं काय आहे? त्यांनी अशा प्रकारचा विषय रिल्स बनवण्यासाठी का निवडला? या तिघा तरुणांकडूनच आपण या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

advertisement

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

इचलकरंजी मधील आक्षेपार्ह रिल केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल बनगोडी, बालाजी डांगे आणि निवृत्ती परीट या तिघा तरुणांना कार्यालयात बोलवून समज देण्यात आली होती. या संदर्भात रिल स्टार विशाल बनगोडी याने पोलिसांनी आम्हाला कार्यालयात बोलवून घेतले होते. आम्ही बनवत असलेल्या रिलमुळे लहान मुलांवर त्याचे परिणाम होत आहेत असं समजावून सांगण्यात आलं. त्यानंतर माफी नाम्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला, असं विशालने सांगितलं.

advertisement

माफीनामाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर या तिघा रिल स्टार्सवर नेटकऱ्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला. विशालच्या म्हणण्याप्रमाणे, आम्ही बनवलेल्या शिवराळ भाषेतील रिलचे खूप चाहते आहेत. लोकांनाच आमच्या तोंडून शिव्या ऐकाव्यात असं त्यांना वाटत असतं. त्यांच्या रिलमध्ये विनोद आणि शिव्या मुक्तपणे असतात त्यामुळे त्यांचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला गेल्याने लोकांच्या पसंतीला लवकर आला होता. त्यामुळे लोकांच्याच पसंतीने आम्ही अशा प्रकारचे रिल बनवत होतो, असं या रिल स्टार्सचे म्हणणं आहे.

advertisement

हे तिघे कोण?

विशाल बनगोडी, बालाजी डांगे आणि निवृत्ती परीट हे तिघे मूळचे इचलकरंजी मधील आहेत. सुरुवातीला यापैकी दोघांनी टिक टॉक या ॲप्लिकेशनचा आधार घेऊन व्हिडिओ करायला सुरु केले होते. टिक टॉक ॲप्लिकेशन बंद झाल्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामकडे आपला मोर्चा वळवला. आणि हळूहळू हे तिघे त्यांच्या शैलीमुळे प्रसिद्ध होऊ लागले. सुरुवातीला त्यांनी विनोदात्मक शैलीतून वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ केले होते पण त्यांना तितका प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत नव्हता. त्याकाळी काही व्हिडिओजमध्ये शिव्यांचा वापर होत होता. हे बघून या तिघांनीही अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचं त्यांनी ठरवलं.

advertisement

लोकांनाच चांगलं बघायची आवड नाही!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

इचलकरंजी मधील मूळचे रहिवासी असणारे हे तिघेही तरुण शिवराळ भाषेत रिल करण्याअगोदर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश असणारे किंवा विनोदक शैलीतील काही वेगवेगळे व्हिडिओ बनवले होते. मात्र प्रेक्षकांचा तितकाचा प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी शिवराळ भाषेत रिल करण्याचं ठरवलं. याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद त्यांना येताना पाहायला मिळाला. या संदर्भात बालाजी डांगे याने सांगताना आपण कोल्हापुरात राहत असल्याने शिव्यांचा तसा आपल्या भाषेमध्ये प्रभाव पाहायला मिळतो. एकंदरीतच लोकांनाच चांगलं बघायची आवड नाहीये. त्यांना अश्लील भाषा किंवा शिवराळ भाषा आपलीशी वाटते. लोकांना आपल्या बोलीभाषे बाबतीत प्रचंड आवड आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही असे व्हिडिओ बनवण्याचं सुरू केलं, असं सांगितलं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
रिलमध्ये शिव्या दिल्यामुळे काय काय सहन करावं लागलं? अखेर नारू, बालाजी आणि विशाल आले समोर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल