चंद्रकांत केदारी शेळके असं अटक केलेल्या ७३ वर्षीय आरोपीचं नाव आहे. तर मोहन सूर्यकांत पोवार असं खून झालेल्या ७० वर्षीय मित्राचं नाव आहे. पोलिसांनी खूनासह पुरावे नष्ट करण्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मोहन पवार आणि आरोपी चंद्रकांत शेळके, दोघंही एकमेकांचे मित्र होते. ते कोल्हापूरच्या हनुमान नगरमध्ये राहायचे. दोघंही एकमेकांचे वर्गमित्र होते. दोघं अनेकदा सोबत फिरायचे. त्यांच्यात गप्पा गोष्टी व्हायच्या. पण काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात मोहन पोवार यांनी चंद्रकांत शेळके यांना आईवरून शिवी दिली. त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत शेळके यांनी धारदार वस्तूने मोहन पोवार यांचा गळा चिरला. या घटनेत मोहन पोवार यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
खून केल्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत शेळके यांनी मोहन पोवार यांच्या खोलीला आग लावली. मात्र, ही घटना पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तपास सुरू केला. जुना राजवाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे तपास करत आरोपी चंद्रकांत शेळके यांना अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मित्रानेच मित्राचा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.