वाहतुकीचे नियोजन
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये सकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. यामध्ये सीपीआर चौक, तोरस्कर चौक, गंगावेश, रंकाळा स्टँड, दसऱ्या चौक अशा प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
केएमटी आणि रिक्षांसाठी बदल
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील केएमटी (Kolhapur Municipal Transport) बस थांबा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. बिंदू चौकाकडून छत्रपती शिवाजी चौकाकडे येणाऱ्या बसेस आता आईसाहेब महाराज पुतळा आणि स्वयंभू गणपती मंदिर चौकातून पुढे जातील. रिक्षा चालकांनी शिवाजी चौकात प्रवासी सोडण्यासाठी आझाद गल्ली कॉर्नर किंवा माळकर तिकटी परिसराचा वापर करावा. या काळात भवानी मंडप आणि माधुरी बेकरी समोरील रिक्षा थांबेही बंद असतील.
advertisement
पार्किंगची सोय
नवरात्रीत रात्रीच्या वेळी पालखी दर्शनासाठी किंवा दिवसभरात दुचाकीवरून येणाऱ्या स्थानिक भाविकांसाठी ७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
- रात्रीची पार्किंग: एमएलजी हायस्कूल, मेन राजाराम हायस्कूल, महाद्वार रोड (सायं. ६ ते १०), बिंदू चौक सबजेल उजवी बाजू, गुजरी दोन्ही बाजू, मराठी बँक परिसर, करवीर पंचायत समिती पटांगण.
- व्हीआयपी पार्किंग: व्हीआयपी वाहनांसाठी विद्यापीठ हायस्कूलसमोरील पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे.
वाहन प्रकारानुसार पार्किंग आणि मार्ग
- पुणे, सातारा, सांगलीकडून येणारी वाहने: तावडे हॉटेल, दसरा चौक, बिंदू चौक पार्किंग, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा येथे येतील.
- कर्नाटक, कागलकडून येणारी वाहने: सायबर चौक, माऊली पुतळा, गोखले कॉलेजमागे शिवाजी स्टेडियमवर, पेटाळा मैदान पार्किंगमध्ये येतील.
- गारगोटी, कळंब्याशेजारी येणारी वाहने: संभाजीनगर, नंगीवली चौक, लाड चौक व गांधी मैदान, ताराबाई हायस्कूल पटांगणावर येतील.
- राधानगरीकडून येणाऱ्या वाहनांनी: क्रशर चौक, लाड चौकातून गांधी मैदान पार्किंगवर यावे.
- कोकण, गगनबावडामार्गे येणारी वाहने: रंकाळा, संध्यामठ परिसरात वाहने उभी करावी.
- शाहूवाडीकडून येणारी वाहने: शिवाजी पुलावरून दसरा चौक किंवा बिंदू चौक पार्किंगमध्ये येतील.
हे ही वाचा : Navratri 2025: कर्णपुरा देवीची यात्रा, नवरात्रीसाठी खास तयारी, या वेळेत दर्शन बंद!
हे ही वाचा : kondhwa Traffic Update : कोंढव्यात उद्या वाहतुक मोठा बदल; कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्गांची लिस्ट जारी