कोल्हापूर : रस्ते वाहतूक नियम पाळणे, याला बऱ्याच जण महत्त्वाचे समजत नाहीत. 'घाई आहे' म्हणून बरेचदा नियम पाळलेच जात नाहीत आणि त्यामुळे सर्वात जास्त अपघात होत असतात. त्यातच वाहन चालवताना रस्त्याकडेला असणाऱ्या दिशादर्शक चिन्हांकडे आणि चौकातील सिग्नलकडे लक्ष देणे गरजेचे असते. वाहतूक परवाना काढताना घेण्यात येणाऱ्या परीक्षेत देखील या दिशादर्शक फलकांबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले असते. मात्र परवाना मिळाल्यानंतर आपण अशा चिन्हांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळेच या दिशादर्शक चिन्हांचे नेमके महत्त्व, आणि ते पाहणे का गरजेचे आहे हेच पाहणार आहोत. याबद्दल कोल्हापुरातील एका मोटर वाहन प्रशिक्षण संस्थेचे मालक सुयोग घाटगे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
खरंतर भारतात रस्ते वाहतुकीसाठी चिन्हांचे काही प्रमुख भाग पडतात. दर्शविण्यात आलेल्या चिन्हांच्या अर्थानुसार हे प्रकार पाहायला मिळतात.
• अनिवार्य चिन्हे - अनिवार्य रस्ता चिन्हे ही गोलाकार आकारात दिशात्मक आदेश दर्शवितात. तसेच ही चिन्हे निळ्या रंगाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या रंगांमध्ये दर्शवली जातात. प्रत्येक वाहनधारकाने या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते.
असा ट्रॅफिक पोलीस पाहिला नसेल, डान्स करुन वाहतूक नियंत्रण, यामागे काय आहे कारण?
1) डावीकडे वळावे - वाहन धारकांनी हे चिन्ह पाहून डावीकडे वळणे बंधकारक आहे.
2) उजवीकडे वळावे - वाहन धारकांनी हे चिन्ह पाहून उजवीकडे वळणे बंधकारक आहे.
3) डावीकडे राहावे - या चिन्हानुसार वाहनधारकांनी डाव्या बाजूलाच आपले वाहन चालवणे गरजेचे आहे. दुतर्फा वाहतूक असणाऱ्या ज्या रस्त्यावर मध्यभागी विभाजक नसतो, अशा ठिकाणी मुख्यतः हे चिन्ह असते.
4) उजवीकडे राहावे - या चिन्हानुसार वाहनधारकांनी उजव्या बाजूलाच आपले वाहन चालवणे गरजेचे आहे. दुतर्फा वाहतूक असणाऱ्या ज्या रस्त्यावर मध्यभागी विभाजक नसतो, अशा ठिकाणी मुख्यतः हे चिन्ह असते.
• निषेधात्मक चिन्हे - वाहनचालकांना जे करण्यास मनाई असते ते दर्शविणारी ही चिन्हे असतात. 'विराम / थांबा' आणि 'रस्ता द्या' अशी अपवादात्मक चिन्हे वगळता निषेधात्मक रस्ते चिन्हे गोलाकार असतात. तर या चिन्हाच्या मध्ये काळा रंगाचा पट्टा ओढलेला असतो. या चिन्हांची दर्शविलेले नियम न पाळल्यास आर्थिक आणि जीवितहानी होऊ शकते. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडही आकारला जाऊ केले जाऊ शकतो. यामध्ये प्रवेश निषिद्ध, वळण्यास मनाई, डावीकडे किंवा उजवीकडे वळण्यास मनाई, ओव्हरटेकिंग करण्यास / वाहन थांबवण्यास / हॉर्न वाजवण्यास मनाई असे नियम दर्शविणारी चिन्हे असतात.
• चेतावणीपूर्ण चिन्हे - वाहनधारकांना वाहन चालवताना काही गोष्टी करणे बंधनकारक नसते. मात्र चेतावणीपूर्ण रस्ता चिन्हे वाहन धारकांना एखाद्या गोष्टीविषयी किंवा रस्त्याच्या स्थितीविषयी माहिती देत असतात. मात्र या चिन्हांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अपघाताला सामोरे जावे लागू शकते. काही अपवाद वगळता यापैकी बहुतेक चिन्हे ही त्रिकोणी आकाराची असतात. तर काही चिन्हांच्या मध्ये एखादी काळी आकृती देखील दर्शवलेली असते. यामध्ये डावे वळण, उजवे वळण, पुढे गोल सर्कल आहे, पुढे सिग्नल आहे, अरुंद रस्ता, अरुंद पूल, रेल्वे फाटक, विना फाटकाचा रेल्वे मार्ग, आदी नियमांबाबत सूचना या चिन्हांच्या माध्यमातून देण्यात येते.
मुंबई पोलिसांमुळे वाचले 83 वर्षांच्या महिलेचे प्राण; बातमी वाचून कराल सॅल्यूट
• सूचनात्मक चिन्ह - या चिन्हांच्या माध्यमातून त्या ठिकाणाच्या जवळपास उपलब्ध असणाऱ्या सुविधांबाबतची माहिती दिली जाते. ही चिन्हे आयताकृती असून निळ्या रंगावर पांढऱ्या किंवा काळया रंगात ही चिन्हे काढलेली असतात. यामध्ये पेट्रोल पंप, हॉस्पिटल, झेब्रा क्रॉसिंग, टेलिफोन बूथ, बस स्टॉप, पार्किंग अशा बऱ्याच ठिकाणांची माहिती देण्यात आलेली असते.
याव्यतिरिक्त प्रत्येक चौकात आपल्याला सिग्नल देखील पाहायला मिळतात या सिग्नल वरून वाहनधारकांना लाल पिवळ्या आणि हिरव्या अशा रंगात थांबा पाहा आणि जा अशा सूचना देण्यात आलेल्या असतात. मात्र सध्या बऱ्याचदा सिग्नल हिरवा होण्याआधीच दहा सेकंद वाहन चालकांची पुढे जाण्यासाठी गडबड सुरू असलेली पाहायला मिळते. अत्यंत चुकीचे बाब आहे, असेही सुयोग घाटके यांनी सांगितले आहे.
आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारची नोकरी सोडली, शेवटी तरुणानं करुन दाखवलं!
दरम्यान वाहतूक नियमां बद्दल किंवा वाहन चालवताना उपयुक्त असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती दर्शवण्यासाठीच ही चिन्हे रस्त्यावर लावण्यात आलेले असतात. त्यामुळे अशी चिन्हे पाहूनच मग आपण आपल्या वाहन चालवणे गरजेचे आहे. असे केले तरच आपण आपल्या आर्थिक किंवा जीवित हानीपासून वाचू शकतो. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या कायदेशीर कारवाई पासून देखील दूर राहू शकतो.





