advertisement

मुंबई पोलिसांमुळे वाचले 83 वर्षांच्या महिलेचे प्राण; बातमी वाचून कराल सॅल्यूट

Last Updated:

मुंबई पोलीस नेहमी नागरिकांसाठी मदत करण्यासाठी दक्ष असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

News18
News18
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलीस नेहमी नागरिकांसाठी मदत करण्यासाठी दक्ष असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुंबई पोलिसांमुळे एका 83 वर्षांच्या महिलेचे प्राण वाचले  आहेत. 83 वर्षांची महिला घरात एकटी राहत असून दरवाजा उघडत नसल्याची माहिती मुंबईतील डॉ. डी.बी मार्ग पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या महिलेचे प्राण वाचवले आहेत.
advertisement
डॉ. डी.बी मार्ग पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, 83 वर्षांची महिला आपल्या घरात एकट्या राहत असून त्या दरवाजा उघडत नसल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यामुळे पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने महिलेच्या घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
असा ट्रॅफिक पोलीस पाहिला नसेल, डान्स करुन वाहतूक नियंत्रण, यामागे काय आहे कारण?
पोलिसांनी त्या महिलेला तात्काळ दवाखान्यात नेलं. महिलेला तातडीनं वैद्यकिय उपचार मिळाल्यामुळे प्राण वाचले आहेत. आता महिलेचे प्रकृती स्थिर आहे. पोलीस पथकाच्या तत्परतेमुळे सदर महिलेला वेळेत दवाखान्यात नेण्यात आल्याने प्राण वाचले. मुंबई पोलिसांमुळे फक्त त्या महिलेचे प्राण वाचलेच नाही तर पुन्हा एकदा वर्दीतील माणूसकी आणि कामातील तत्परताही दिसून आली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई पोलिसांमुळे वाचले 83 वर्षांच्या महिलेचे प्राण; बातमी वाचून कराल सॅल्यूट
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement