TRENDING:

G G Parekh Passed Away : स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी जी पारेख यांचे निधन

Last Updated:

G G Parikh Passes Away: भारत स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक समाजवादी विचारांचे नेते गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात जी. जी. पारेख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार हरपला, स्वातंत्र्यसैनिक जी जी पारेख यांचे निधन
स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार हरपला, स्वातंत्र्यसैनिक जी जी पारेख यांचे निधन
advertisement

मुंबई : भारत स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक समाजवादी विचारांचे नेते गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात जी. जी. पारेख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. मुंबईतील ग्रँट रोड येथील राहत्या घरी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात डॉ. जी. जी. पारेख हे 'चले जाव' चळवळीत तुरुंगात गेले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर जी जी पारेख हे समाजवादी चळवळींसह सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांच्या निधनाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला एक साक्षीदार आणि चालताबोलता इतिहास हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

advertisement

आज दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल येथील ताडदेवमधील जनता केंद्र येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णलयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

भारत छोडो आंदोलनादरम्यान गांधींच्या नेतृत्वाखाली आणि नंतर आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीदरम्यान जीजी पारिख यांना तुरुंगात टाकण्यात आले. वयाच्या 100 व्या वर्षीही ते सक्रिय होते. जी जी पारेख यांचा जन्म 30 डिसेंबर 1923 रोजी झाला. सौराष्ट्र प्रांत, मग राजस्थान आणि नंतर बॉम्बे प्रांत अशा तीन ठिकाणी त्यांचं शिक्षण झाले. जीजी पारेख 8 वर्षांचेच असताना त्यांची आणि महात्मा गांधींची भेट झाली.

advertisement

जी जी पारिख यांनी जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, लोहिया, युसूफ मेहेरअली आणि इतरांसोबत 1934 मध्ये काँग्रेस पक्षात काँग्रेस सोशलिस्ट पार्टी (सीएसपी) नावाचा एक गट स्थापन केला. या गटाने काँग्रेस पक्षात दबाव आणला आणि पक्षाला वैचारिक दिशा दिली. जीजी सीएसपीचे सदस्य देखील होते.

advertisement

जून 1976 मध्ये आणीबाणीविरुद्ध जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वातील चळवळ शिगेला पोहोचली होती. त्यावेळी बहुचर्चित बडोदा डायनामाइट प्रकरण घडले. या प्रकरणात विरोधी पक्षनेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला आणि त्यांना तिहार तुरुंगात टाकले. जीजी त्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक होते. 1947 मध्ये सीएसपी नेत्यांनी काँग्रेस पक्षापासून वेगळे होऊन समाजवादी पक्षाची स्थापना केली. असमानता दूर करणे, रोजगार निर्माण करणे आणि वंचितांसाठी विशेष प्रयत्न करणे हे समाजवाद्यांच्या प्राधान्यक्रमाचे काम होते.

advertisement

डॉ. जी. जी. पारेख हे गांधीवादी आणि समाजवादी विचारसरणीवर ठाम राहिले. मुंबईत काही वर्षापूर्वी झालेल्या एनआरसी-सीएए विरोधी हजारोंच्या मोर्चात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. मुंबईचे महापौर राहिलेले, समाजवादी नेते, स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते युसूफ मेहरअली यांचा जीजी पारेखांवर मोठा प्रभाव होता. 1950 साली वयाच्या 47 व्या वर्षी युसुफ मेहेरअलींचं निधन झाले. त्यानंतर मेहरअली यांच्या स्मरणार्थ जीजींनी युसुफ

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
G G Parekh Passed Away : स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी जी पारेख यांचे निधन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल