राज्यात बुधवारी झालेल्या मतदानात मतदारांचा उत्साह दिसून आला. यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. मविआतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. या गटांना पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर राजकीय अस्तित्वाची लढाई असणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्या तुलनेत शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी दिसून आले. मराठवाडा आणि विदर्भात मतदानाचे प्रमाण चांगलेच वधारले.
advertisement
मविआतील ज्येष्ठ नेते संपर्कात
राज्यातील विधानसभा निवडणूक मध्ये झालेल्या मतदानानंतर महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. या नेत्यांनी राज्यातील मतदानाच्या वाढीव आकडेवारी चर्चा झाली. त्याशिवाय, मतदानाचे पॅटर्न, एक्झिट पोलवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय नेतृत्वात सोबत चर्चा करण्यासाठी आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार हे केंद्रबिंदू असण्याची शक्यता आहे.
