खरं तर लोकसभेपासून आता विधानसभेपर्यंत खरी शिवसेना कुणाची? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. हे प्रकरण कोर्टात देखील पोहोचले होते. मात्र यावर निवडणुकीआधी काही निर्णय येऊ शकला नव्हता.त्यामुळे हा प्रश्न जनतेच्या मनात प्रलंबित होता.अखेर यावर आता एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. खरी शिवसेना कुणाची हे आता लोकांनी ठरवलं आहे,असे एका वाक्यात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
advertisement
एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आहे. हे आता लोकांनी ठरवलं आहे. 2019 ला 56 जागा जिंकल्या होत्या आणि आताही 56 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मला समाधान वाटतंय, असे शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही आरोपांना उत्तर देत बसलो नाही. आम्ही लोकांमध्ये गेलो.विकासाला लोकांनी मत दिलं आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबूकवरून सरकार चालवता येत नाही,असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना चिमटा काढला.
Devendra Fadanvis: निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांचं मनोज जरांगेंना जशास तसं उत्तर
