शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडली. त्यावेळी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी मोठ्या प्रमाणावर शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर शिवसेना हा पक्ष आणि अधिकृत निवडणूक चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडील गटाला देण्यात आले. तर, एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ दिली आणि महायुतीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली निवडणूक असल्याने ठाकरेंसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. शिवसेना ठाकरे गटाने या विधानसभेच्या निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केली. शिवसेना ठाकरे गटाला 20 जागांवर यश मिळाले. या 20 जागांमध्ये मुंबईतून मोठ्या प्रमाणावरील जागांचा समावेश आहे. राज्यात धूळधाण होत असताना ठाकरेंनी मुंबईतील आपले स्थान कसेबसे टिकवून ठेवले.
advertisement
ठाकरे गटाचा मुंबईत कोणत्या जागांवर विजयी?
शिवसेनेचे मुंबई, ठाणे या पट्ट्यात चांगले काम आहे. शिवसेनेतील फूट पडल्यानंतर ठाकरेंसमोर मुंबईतील आपले स्थान टिकवण्याचे मोठे आव्हान होते. त्यात काही प्रमाणात ठाकरे यशस्वी झाल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचा 20 जागांचा विजय झाला. त्यातील 10 जागा या मुंबईतील आहेत.
मुंबईत ठाकरेंचे विजयी उमेदवार आणि मतदारसंघ
- विक्रोळी - सुनिल राऊत
- जोगेश्वरी पूर्व - बाळा नर
- वर्सोवा - हारून खान
- वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
- माहीम - महेश सावंत
- वरळी - आदित्य ठाकरे
- शिवडी - अजय चौधरी
- भायखळा - मनोज जामसुतकर
- दिंडोशी - सुनिल प्रभू
- कलिना - संजय पोतनीस
जिथे 'व्होट जिहाद' म्हणाले तिथेच भाजपचा डंका, मुस्लिम बहुल भागात महायुतीची मुसंडी
