२०२२ ,२३ मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या संदर्भात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दहशतवादविरोधी पथक काही संशयितांवर नजर ठेवून होते. संशयित लोकांनी दहशतवाद्यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. गेली अनेक महिने पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र संशयितांकडून कोणत्याही सक्रीय हालचाली होत नव्हत्या. अखेर गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाने कोंढवा, खडक, खडकी, वानवडी आणि भोसरी येथे शोधमोहीम राबवून तब्बल १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
advertisement
वर्षे २०२२ ,२३ मध्ये पुण्यातील परिसरात छापेमारी करीत दहशतवादी विरोधी पथकाने २ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतले होते. यात पथकाला या दोन आरोपींकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य मिळाले होते. तसेच बॉम्ब कसा बनवला जातो याचा एक फॉर्म्युला देखील पथकाने जप्त केला होता. तर या दोन संशयित अतिरेक्यांनी गोळीबाराचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या अतिरेक्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळी बैठका देखील घेतल्याचे तपासात उघड झाले होते. याच कोंढवा परिसरात हे संशयित अतिरेकी भाड्याने राहत होते.
पोलीस चौकशीत दहशतवाद्यांच्या संपर्कात १८ जण आले असल्याचा संशय व्यक्त केला होता. याच १८ जणांवर पथकाने गेली दोन वर्षे पाळत ठेवली होती. गेल्या दोन वर्षात यांच्या सक्रीय हालचाली न झाल्याने पथकाने अखेर काल रात्री उशिरा छापेमारी करत आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
जुलै २०२३ मध्ये कारवाई करत पुण्यातील कोंढवा परिसरातून मोहम्मद शहानवाज शफी उजमा खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी या दोन आरोपींना अटक करण्यात आले होते. तर तलाहा लियाकत अली खान आणि दस्तगीर खान हे दोन संशयित आरोपी फरार होते.