TRENDING:

अजितदादांना समज द्या, भाजप आमदारांची थेट अमित शाहांकडे तक्रार, नांदेडमध्ये काय घडलं?

Last Updated:

Amit Shah Maharashtra Daura: विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई अशा तीन विभागांना भेटी देऊन, तेथील नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती अमित शाह यांनी या माध्यमातून केल्याचे सांगितले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तक्रार भाजप आमदारांनी केल्याचे समजते. त्यामुळे सत्तेत एकत्र असतानाही मित्रपक्षांमध्ये प्रचंड धुसफूस असल्याने महायुतीतील बेबनाव समोर आल्याचे बोलले जाते.
अमित शाह-अजित पवार
अमित शाह-अजित पवार
advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई अशा तीन विभागांना भेटी देऊन, तेथील नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती त्यांनी या माध्यमातून केल्याचे सांगितले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षांमध्ये भाजप कसा वरचढ राहिल, याची काळजी घेण्याचे निर्देश देखील अमित शाह यांनी दिल्याचे समजते.

advertisement

भाजप आमदारांनी अजित पवार यांची अमित शाहांकडे तक्रार का केली?

दुसरीकडे भाजपची शक्ती दिवसेंदिवस राज्यात वाढत असताना अजित पवार यांच्याकडून मात्र भाजपच्या नेते कार्यकर्त्यांच्या कामात अडथळा आणला जात असल्याची तक्रार भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे समजते. अजित पवार हे भाजप आमदार तसेच पदाधिकाऱ्यांच्या विरोधकांना ताकद देण्याचे काम करत असल्याची नाराजी भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे बोलून दाखवली. नांदेडच्या शंखनाद मेळाव्यानंतर आमदारांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचे कळते आहे.

advertisement

गत विधानसभा निवडणुकीत भाजप आमदारांकडून जे राष्ट्रवादीचे नेते पराभूत झाले आहेत, त्यांना ताकद देण्याचे काम अजित पवार यांच्याकडून होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपला मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. सत्तेत असतानाही तेथील राष्ट्रवादीचे नेते भाजप नेते-पदाधिकाऱ्यांवर कुरघोडी करत असल्याची तक्रार भाजप आमदारांनी अमित शाह यांच्याकडे केली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी उजवी व्हायची असेल तर अजित पवार यांना भाजप नेतृत्वाने समज द्यावी, जेणेकरून ते भाजप पदाधिकाऱ्यांच्या रस्त्यात आडकाठी आणणार नाही, अशा स्पष्ट शब्दात आमदारांनी अजित पवार यांच्याविरोधात तक्रार केली.

advertisement

भाजप आमदारांच्या तक्रारीनंतर अमित शाह यांची अजित पवार यांच्याशी चर्चा

अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये ऐनवेळी बदल झाला असून ते मंगळवारी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्याआधी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. उभय नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेतील तपशील अजून कळू शकलेला नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांना समज द्या, भाजप आमदारांची थेट अमित शाहांकडे तक्रार, नांदेडमध्ये काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल