टीईटी परीक्षेची तारीख ठरली, अर्ज भरण्याची मुदत काय? परीक्षा कधी होणार?
दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात, त्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे लक्ष या प्रक्रियेकडे लागलेले असते. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे शुल्क आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख उद्यापासून सुरू होणार आहे. नियमित शुल्क भरून १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येणार आहे. दहावी परीक्षेचे अर्ज हे केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फतच हे अर्ज भरावे, असं मत मंडळाने स्पष्ट केले आहे.
advertisement
गोव्यामध्ये मैत्रिणीसोबत मौजमजा, रोमियो चोराला ट्रिप पडली महागात; पोलिसांनी थेट लॉकअपमध्ये टाकला
विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया 'यूडायस प्लस' मधील पेनआयडी वरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत केली जाणार आहे. पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्यांचे अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर (www.mahahsscboard.in) उपलब्ध होतील. हे अर्जही शाळाप्रमुखांमार्फत भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आरटीजीएस/ एनईएफटी याद्वारे भरावे लागणार आहे. त्याची पावती, चलन आणि विद्यार्थ्यांची यादी निर्धारित तारखेला सादर करावी लागेल.
शाळांनी घ्यायची काळजी
- सर्व शाळांनी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी 'स्कूल प्रोफाइल' मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय व शिक्षकांची अचूक माहिती भरून पाठवावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर शाळेच्या 'स्कूल लॉगइन' वर प्री-लिस्ट उपलब्ध होईल. या यादीची छपाई करून विद्यार्थ्यां मार्फत माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळावी.
- विद्यार्थ्यांनी पडताळणी करून स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे, प्री-लिस्टच्या प्रत्येक पानावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का आवश्यक आहे.
- नियमित विद्यार्थ्यांची माहिती 'यूडायस प्लस'मध्ये नसेल, तर संपूर्ण माहिती भरून अर्ज दाखल करता येईल.
- पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व आयटीआय विद्यार्थ्यांची माहिती 'यूडायस प्लस'मध्ये उपलब्ध नसल्याने त्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरले जातील.