Thane News : गोव्यामध्ये मैत्रिणीसोबत मौजमजा, रोमियो चोराला ट्रिप पडली महागात; पोलिसांनी थेट लॉकअपमध्ये टाकला
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Thane News : कर्जत नजीक असणार्या नेरळमध्ये लाखो रूपयांची चोरी करून मित्र- मैत्रिण पार्टी करण्यासाठी पसार झाले आहेत. मित्राने चोरी करून मैत्रिणीसोबत गोव्यात मौजमजा केली आहे.
कर्जत नजीक असणार्या नेरळमध्ये लाखो रूपयांची चोरी करून मित्र- मैत्रिण पार्टी करण्यासाठी पसार झाले आहेत. मित्राने चोरी करून मैत्रिणीसोबत गोव्यात मौजमजा केली आहे. गोव्यामध्ये मौज मजा करत असतानाच पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. नेरळमध्ये पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी चोरी करून पळालेला चोर मैत्रिणीसोबत गोवा फिरत असल्याची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी त्याला गोव्यातून अटक केली.
शहवान फरयाझ शेख (वय ३३, रा. दांडेकरवाडी नवीवस्ती, भिवंडी, जि. ठाणे) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने मैत्रिणीच्या नेरळच्या घरामधील चोरलेली रोख रक्कम गोव्यात मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यात खर्च केल्याचे समोर आले आहे. त्या चोरट्याने पोलिसांना तपासामध्ये ही माहिती दिली आहे. पोलिसांनी आपल्या अथक प्रयत्नाने या मित्र- मैत्रिणीचा शोध घेतला आहे. गणेशोत्सव काळात नेरळच्या राजेंद्र गुरूनगरमधील अंबिका अपार्टमेंटमध्ये २ सप्टेंबरला मोठी चोरी झाली होती.
advertisement
गणेश संनगरे यांच्या पहिल्या मजल्यावरील घराचे लोखंडी कपाट फोडून ७ तोळे सोने, ६ लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्याने चोरून नेला होता. त्यामध्ये चोरट्याने दोन गंठण, चैन, ब्रेसलेट, अंगठी आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केला होता. चोरीसाठी वापरलेला लोखंडी रॉडही घटना स्थळाजवळ सापडला. चोरीची तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी चार शोधपथके तयार करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू होता. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलिसांनी काटेकोर तपास करून अखेर गोव्यातून त्याला ताब्यात घेतले.
Location :
Maharashtra
First Published :
September 14, 2025 6:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News : गोव्यामध्ये मैत्रिणीसोबत मौजमजा, रोमियो चोराला ट्रिप पडली महागात; पोलिसांनी थेट लॉकअपमध्ये टाकला