IND vs PAK सामन्यात खेळाडूंच्या हातात काहीच नाही, 'एक्स-फॅक्टर' ठरवणार मॅचचा निकाल, तुमचाही विश्वास बसणार नाही!

Last Updated:

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये आशिया कपचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी कागदावर भारतीय टीम पाकिस्तानपेक्षा मजबूत दिसत असली तरी टी-20 मध्ये एखादा खेळाडूही मॅचचा निकाल बदलवू शकतो.

IND vs PAK सामन्यात खेळाडूंच्या हातात काहीच नाही, 'एक्स-फॅक्टर' ठरवणार मॅचचा निकाल, तुमचाही विश्वास बसणार नाही!
IND vs PAK सामन्यात खेळाडूंच्या हातात काहीच नाही, 'एक्स-फॅक्टर' ठरवणार मॅचचा निकाल, तुमचाही विश्वास बसणार नाही!
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये आशिया कपचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी कागदावर भारतीय टीम पाकिस्तानपेक्षा मजबूत दिसत असली तरी टी-20 मध्ये एखादा खेळाडूही मॅचचा निकाल बदलवू शकतो, त्यामुळे भारतीय टीमला गाफील राहून चालणार नाही. दुबईच्या या मैदानामध्ये टॉसही महत्त्वाची भूमिका बजावतो. टीम इंडियाने लागोपाठ 15 टॉस हरल्यानंतर युएईमध्ये झालेल्या आशिया कपच्या पहिल्या सामन्यात टॉस जिंकला होता. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही टॉस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

टॉसच ठरणार मॅचचा बॉस

दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 मॅच झाल्या आहेत, या तीनही सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीम जिंकल्या आहेत. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुबईमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला होता. तर 2022 च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेटने पराभव केला, यानंतर पुढच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेटने धूळ चारली. या सामन्यांचं रेकॉर्ड पाहिलं तर तीनही सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा पराभव झाला आहे.
advertisement
आशिया कप 2025 च्या सामन्यातही जी टीम टॉस जिंकेल ती पहिले बॉलिंगचा निर्णय घेईल. फक्त आशिया कपच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या मागच्या 8 पैकी 7 मॅच आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमने जिंकल्या आहेत.

दुबईमध्ये चेस करणं सोपं

दुबईच्या मैदानामध्ये आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जातं, असा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. दुबईची खेळपट्टी सुरूवातीला धीमी असते, त्यामुळे बॉल थांबून येतो आणि बॅटरला शॉट खेळणं कठीण जातं. जशी रात्र होत जाते, तसं दुबईतलं वातावरण थंड होत जातं, ज्यामुळे खेळपट्टी जलद होत जाते आणि त्यामुळे बॉल बॅटवर चांगल्या पद्धतीने येतो आणि शॉट खेळणं सोपं होतं. आता दुबईच्या या मैदानात सूर्यकुमार यादव टॉस जिंकणार का सलमान अली आहा, यावर मॅचचा निकालही अवलंबून आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यात खेळाडूंच्या हातात काहीच नाही, 'एक्स-फॅक्टर' ठरवणार मॅचचा निकाल, तुमचाही विश्वास बसणार नाही!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement