TET Exam Timetable : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, अर्ज भरण्याची मुदत काय? परीक्षा कधी होणार?

Last Updated:

Teacher Eligibility Test Timetable Announced : महाटीईटी परीक्षा सर्व व्यवस्थापनामधील, ज्यात शासकीय, अशासकीय, कायम विना अनुदानित शाळा, सर्व बोर्ड आणि माध्यमांतील इयत्ता 1ली ते 8वी च्या शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. परीक्षेची जाहिरात अलीकडेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली आहे.

News18
News18
राज्यातल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2025 ची घोषणा केली आहे. शिक्षक पदासाठी ही परीक्षा फार गरजेची असते. या परीक्षेला TET असं म्हणतात. ही महाटीईटी (MAHATET 2025) परीक्षा सर्व व्यवस्थापनामधील, ज्यात शासकीय, अशासकीय, कायम विना अनुदानित शाळा, सर्व बोर्ड आणि माध्यमांतील इयत्ता 1ली ते 8वी च्या शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. परीक्षेची जाहिरात अलीकडेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligible Test) नोव्हेंबर 2025 मध्ये, आयोजित करण्यात येणार आहे. या पात्रता परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे. ऑनलाईन अर्ज- परीक्षा शुल्क भरण्याची, हॉलतिकीट काढण्याची आणि परीक्षेची तारीख अशा सर्व तारखांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 (पेपर 1) आणि इयत्ता 6 ते 8 (पेपर 2) च्या शिक्षक पदांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जाला 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर असणार आहे. तर ज्या इच्छूक उमेदवरांनी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, त्यांना प्रवेशपत्र 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.
advertisement
तर, परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे. पहिला पेपर 23 नोव्हेंबरला सकाळी 10: 30 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत होणार आहे, तर दुसरा पेपर 23 नोव्हेंबरलाच दुपारी 02:30 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत होणार आहे. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती, ज्यात शासकीय निर्णय, पुरवणी माहिती, सूचना, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शुल्क भरण्याची प्रक्रिया, परीक्षेचे वेळापत्रक यासह इतर आवश्यक तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. काही प्रशासकीय अडचणीमुळे परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर लगेचच प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती बोर्डाने जाहिरातीत दिली आहे.
advertisement
टीईटी परीक्षेविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षक वर्गात या टीईटी परीक्षेबाबत गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चा होत असतानाच परीक्षा परिषदेने या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
TET Exam Timetable : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, अर्ज भरण्याची मुदत काय? परीक्षा कधी होणार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement