Ind vs Pak सामना का झाला पाहिजे? हिंदुत्ववादी कीर्तनकाराचं लॉजिक ऐकाच!

Last Updated:

Ind vs Pak सामना झालाच पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्रातील चर्चेतील हिंदु्त्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी मांडली आहे. उभय देशांत सामना का झाला पाहिजे? याचे खास लॉजिक भंडारे यांनी मांडले आहे.

संग्राम भंडारे
संग्राम भंडारे
मुंबई : आशिया कप करंडक स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात रविवारी लढत होत आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंकर भारताने पाकिस्तान विरोधात राबविले ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदात उभय संघांमध्ये क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याची जोरदार चर्चा आहे. ज्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या त्या देशाच्या संघाबरोबर भारताने खेळू नये, अशी भूमिका अनेक जण मांडत आहे. मात्र हा सामना झालाच पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्रातील चर्चेतील हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी मांडली आहे. उभय देशांत सामना का झाला पाहिजे? याचे खास लॉजिक भंडारे यांनी सांगितल्याने त्यांच्या भूमिकेवर उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

संग्राम बापू भंडारे काय म्हणाले?

पाकिस्तानने २७ लोकांना धर्म विचारून गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानचे शेकडो दहशतवादी ठार मारले. पाकिस्तानचे शेकडो दहशतवादी मेल्यानंतरही ते आपल्याशी जर क्रिकेट खेळायला तयार असतील, तर मग आपण का मागे सरायचे?
पाकिस्तानचे खेळाडू बॉल घेऊन येणार असतील तर आपण बॅट घेऊन तयार असले पाहिजे. आपण जर त्यांच्यासोबत क्रिकेटचा सामना खेळलो नाही तर मोदी पाकिस्तानला घाबरले असे पाकिस्तानमध्ये आणि भारताच्या काही भागांत बॅनर लागतील. भारत पाकिस्तानला घाबरू शकतो का कधी?
advertisement
खेळ म्हटले की हारजीत ठरलेली आहे. पण माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडेही युद्ध म्हणून पाहिले पाहिजे. म्हणून सामना तर झालाच पाहिजे. परंतु नरेंद्र मोदी यांना माझी विनंती असेल की खेळाच्या आधी आणि खेळ झाल्यानंतर जी हस्तांदोलनाची परंपरा आहे ती आज होता कामा नये. त्यांच्यात आणि आपल्यात बॅट आणि बॉलचं युद्ध होऊ द्यात. हस्तांदोलन जर टाळता आले तर नक्की प्रयत्न करा. पण सामना झालाच पाहिजे. जिंकू किंवा हरू पण खेळू ना... पळून थोडी जाणार आपण... पाकिस्तानसोबत जीवाचे रान करून आपले खेळाडू खेळतील, याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि पाकिस्तनाची आज पुन्हा जिरवू... जय श्रीराम
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ind vs Pak सामना का झाला पाहिजे? हिंदुत्ववादी कीर्तनकाराचं लॉजिक ऐकाच!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement