'दैनिक लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केले. राज ठाकरे यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की, आम्ही एकत्र येणे असे वाटणे वेगळं आहे आणि असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. त्यांच्याकडूनही काही लोक बोलत असतात, सांगत असतात आणि करत असतात असेही राज यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असे वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय, असे म्हटले.
advertisement
उद्धव यांना भावापेक्षा 'ती' लोक जवळची...
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबतवर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे, असे म्हटले. उद्धव ठाकरे यांना भावापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असेही राज यांनी म्हटले.
याला खंत म्हणा अथवा...
उद्धव यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत पुढं बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, हिंदुत्ववादी शिवसेनेचा वर्सोव्याचा उमेदवार हारून खान असेल. त्यांचे दिंडोशीचे उमेदवार उर्दूतून पत्रके काढत असतील. काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून कुठेही बाळासाहेब ठाकरेंचे नावही घेतले जात नसेल, काँग्रेसची मफलर गळ्यात घालून उद्धव ठाकरे फिरणार असतील तर सगळ्याच गोष्टींचा व्यभिचार करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि बाकीच्या गोष्टींसाठी नाही. याला तुम्ही माझी खंत म्हणा किंवा अन्य काही, पण हे वास्तव असल्याचेही राज यांनी मुलाखतीत म्हटले.
