Maharashtra Elections Raj Thackeray On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत युती करणार? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Raj Thackeray On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत युती का होत नाही, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनातलं अखेर सांगितलं.
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, याची चर्चा सुरू असते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या. त्यानंतर आता दोन्ही नेते, एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतात. उद्धव ठाकरेंसोबत युती का होत नाही, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनातलं अखेर सांगितलं.
आम्ही एकत्र येऊ नये यासाठी....
दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केले. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचे राज ठाकरे आहेत. यामध्ये काहीजण आतले आहेत आणि बाहेरचेही असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. माझ्याकडून मी सतर्क असतो. माझ्या कानावर अनेक गोष्टी येत असतात, काही गोष्टी समजत असतात पण त्या गोष्टी ऐकत नाही असेही राज यांनी स्पष्ट केले.
advertisement
राज ठाकरे यांनी मुलाखतीत पुढे म्हटले की, एकत्र येणे असे वाटणे वेगळं आहे आणि असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. त्यांच्याकडूनही काही लोक बोलत असतात, सांगत असतात आणि करत असतात असेही राज यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असे वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय, असे म्हटले.
advertisement
उद्धव-राजमध्ये युती होणार?
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबतवर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा विषयच नाही. प्रश्न असा आहे की यात चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा जर होतच नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षांचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात. पण, उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते. भाऊ वाटत नाही. यावर माझ्याकडे बोलण्यासारखे काय असू शकेल, असेही राज यांनी म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 13, 2024 7:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Raj Thackeray On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत युती करणार? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं...








