TRENDING:

Sharad Pawar Election Result : 'ट्रम्पेट'ने 'तुतारी'चा आवाज दाबला, शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराचा निसटता पराभव

Last Updated:

Maharashtra Elections : संदीप नाईक यांच्या पराभवाला ट्रम्पेट ही निशाणी असलेल्या उमेदवाराचा फटका बसला. तर, दुसरीकडे संदीप नाईक यांना त्यांच्या नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराचा फटका बसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विश्वनाथ सावंत,  प्रतिनिधी, नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या एका उमेदवाराला ट्रम्पेटमुळे पराभवाचा धक्का बसला. बेलापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा पराभव झाला. संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला. भाजपच्या विद्यमान आमदार मंद्रा म्हात्रे यांनी नाईकांचा पराभव केला. संदीप नाईक यांच्या पराभवाला ट्रम्पेट ही निशाणी असलेल्या उमेदवाराचा फटका बसला. तर, दुसरीकडे संदीप नाईक यांना त्यांच्या नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराचा फटका बसला.
ट्रम्पेटने तुतारीचा आवाज दाबला, शरद पवारांच्या उमेदवाराचा निसटता पराभव
ट्रम्पेटने तुतारीचा आवाज दाबला, शरद पवारांच्या उमेदवाराचा निसटता पराभव
advertisement

बेलापूर विधानसभेत ट्रम्पेट चिन्ह आणि नाम साधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना फटका बसला. महाविकास आघाडीचे संदीप नाईक यांचा केवळ 377 मतांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केला. मात्र, याच ठिकाणी प्रफुल्ल म्हात्रे या अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट चिन्हामुळे 2860 मते मिळाली. तर संदीप नाईक नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला 513 मते मिळाली आहेत. त्यामुळे ट्रम्पेट चिन्ह आणि नाम सामर्थ्य असलेल्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे संदीप नाईक यांचा पराभव झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

advertisement

भाजपच्या विजयी उमेदवार मंदा म्हात्रे यांना 91 हजार 852 मते पडली. तर, संदीप नाईक यांना 91 हजार 475 मते मिळाली.

मंदा म्हात्रे यांच्या नावाशी साधर्म्य असलेली उमेदवार...

या मतदासंघात फक्त संदीप नाईकच नव्हे तर भाजपच्या विजयी उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या मंदा म्हात्रे या आणखी एक उमेदवार होत्या. त्यांना 557 मते मिळाली.

advertisement

वळसे पाटील निकमांमुळे वाचले...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

आंबेगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांचा 1523 मतांनी विजय झाला. शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांचा त्यांनी पराभव केला. देवदत्त निकम यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार देवदत्त निकम या अपक्ष उमेदवाराला 2965 मते मिळाली. हा फटका बसला नसता तर शरद पवारांचा आणखी एक उमेदवार विजयी झाला असता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar Election Result : 'ट्रम्पेट'ने 'तुतारी'चा आवाज दाबला, शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराचा निसटता पराभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल