NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी

Last Updated:

Sharad Pawar Vs Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिला.

अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी
अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी
पुणे :  शरद पवार यांच्याशी फारकत घेत 40 आमदारांसह अजित पवार यांनी शड्डू ठोकला आणि पक्षाचे चिन्ह आपल्या बाजूने खेचले. तर, दुसरीकडे शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करत अजित पवारांना आव्हान दिले. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड दिला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे 37 जागांवर आमनेसामने आले. लोकसभेत अजित पवार आणि शरद पवार आमनेसामने आले होते. त्यात शरद पवार सरस ठरले. आता मात्र, अजित पवारांनी त्या पराभवाची सव्याज परतफेड केली. अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. अजित पवारांनी 37 पैकी 27 जागांवर विजय मिळवला. तर शरद पवार गटाची 8 जागांवर सरशी झाली. उर्वरित 2 जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.
advertisement
मतदारसंघराष्ट्रवादी (शरद पवार)राष्ट्रवादी (अजित पवार)विजयी उमेदवार
बारामतीयुगेंद्र पवारअजित पवारअजित पवार
तुमसरचरण वाघमारेराजू कारेमोरेराजू कारमोरे
अहेरीभाग्यश्री आत्रामधर्मरावबाबा आत्रामधर्मरावबाबा आत्राम
पुसदशरद मैंदइंद्रनील नाईकइंद्रनील नाईक
वसमतजयप्रकाश दांडेगावकरचंद्रकांत नवघरेचंद्रकांत नवघरे
 येवलामाणिकराव शिंदेछगन भुजबळछगन भुजबळ
 सिन्नरउदय सांगळेमाणिकराव कोकाटेमाणिकराव कोकाटे
दिंडोरीसुनीता चारोसकरनरहरी झिरवळनरहरी झिरवळ
शहापूरपांडुरंग बरोरादौलत दरोडादौलत दरोडा
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाडनजीब मुल्लाजितेंद्र आव्हाड
अणुशक्ती नगरफहाद अहमदसना मलिकसना मलिक
श्रीवर्धन अनिल नवगणेअदिती तटकरेअदिती तटकरे
जुन्नरसत्यशील शेरकरअतुल बेनकेशरद सोनावणे (अपक्ष)
आंबेगावदेवदत्त निकमदिलीप वळसे पाटीलदिलीप वळसे पाटील
शिरूरअशोक पवारज्ञानेश्वर कटकेज्ञानेश्वर कटके
इंदापूरहर्षवर्धन पाटीलदत्तात्रय भरणेदत्तात्रय भरणे
पिंपरीसुलक्षणा शिलवंतअण्णा बनसोडेअण्णा बनसोडे
वडगाव शेरीबापूसाहेब पठारेसुनील टिंगरेबापूसाहेब पठारे
हडपसरप्रशांत जगतापचेतन तुपेचेतन तुपे
अकोलेअमित भांगरेडॉ. किरण लहामटेडॉ. किरण लहामटे
कोपरगावसंदीप वर्पेआशुतोष काळेआशुतोष काळे
पारनेरराणी लंकेकाशीनाथ दातेकाशीनाथ दाते
अहमदनगर शहरअभिषेक कळमकरसंग्राम जगतापसंग्राम जगताप
माजलगावमोहन जगतापप्रकाश सोळंकेप्रकाश सोळंके
बीडसंदीप क्षीरसागरयोगेश क्षीरसागरसंदीप क्षीरसागर
 परळीराजेसाहेब देशमुखधनंजय मुंडेधनंजय मुंडे
अहमदपूरविनायक जाधवबाबासाहेब पाटीलबाबासाहेब पाटील
माढाअभिजीत पाटीलमीनल साठेमीनल साठे
मोहोळराजू खरेयशवंत मानेराजू खरे
फलटणदीपक चव्हाणसचिन पाटीलसचिन पाटील
वाईअरुणा पिसाळमकरंद पाटीलमकरंद पाटील
चिपळूणप्रशांत यादवशेखर निकमप्रशांत यादव
चंदगडनंदिता बाभूळकरराजेश पाटीलराजेश बाभूळकर
कागलसमरजित घाटगेहसन मुश्रीफहसन मुश्रीफ
इस्लामपूरजयंत पाटीलनिशिकांत पाटीलजयंत पाटील
तासगावरोहित पाटीलसंजय पाटीलरोहित पाटील
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांचा वस्तादाला धोबीपछाड! शरद पवारांच्या किती उमेदवारांचा केला पराभव? पाहा यादी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement