मराठवाड्यात कुणाची हवा?
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागा ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत गरजेची आहे. विदर्भ हा सर्वात जास्त मतदारसंघ असलेल्या विभाग आहे. त्यानंतर नंबर लागतो तो मराठवाड्याचा. मराठवाड्यात एकूण 46 मतदारसंघ आहे. त्यामुळे मराठावाड्यात जास्ती जास्त जागा जिंकून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार खिंड लढवली आहे.
किती आहे मतदारसंघ?
advertisement
मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड आहे. तर एकूण 46 मतदारसंघ आहे.
छत्रपती संभाजीनगर
सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, पैठण, गंगापूर, वैजापूर
नांदेड
किनवट, हदगाव,भोकर,नांदेड, लोहा, नायगाव, देगलूर
हिंगोली
वसमत, कळमनुरी, हिंगोली
परभणी
जिंतूर,परभणी, गंगाखेड, पाथरी
जालना
परतूर, घनसावंगी, जालना, दनापूर, भोकरदन
बीड
गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज, परळी
लातूर
लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा,औसा
धाराशिव
उमरगा, तुळजापूर, धाराशिव, परांडा
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 46 जागांपैकी 16 ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर शिवसेनेनं 12 जागा जिंकल्या होत्या. पण आता शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहे. यातील ९ आमदार हे शिंदेंसोबत आहे. ठाकरेंसोबत फक्त 3 आमदार आहे. काँग्रेस ८, राष्ट्रवादी ८ , रासप १ आणि १ जागा अपक्षाने जिंकली होती.
अलीकडेच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला. एकूण सहा जागापैकी फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच जागा जिंकता आली होती. तर महाविकास आघाडीने ५ जागा जिंकून महायुतीला दणका दिला होता.
मनोज जरांगे फॅक्टर?
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची लोकसभा निवडणुकीमध्ये पडद्याआड भूमिका महत्त्वाची ठरली होती. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे, जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या अनेक ठिकाणी महायुतीच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा समाजाची मतं निर्णयाक ठरली होती. यावेळीही विधानसभेदरम्यान महायुतीच्या उमेदवारांना पाडणार अशी गर्जनाच जरांगेंनी केली होती. एवढंच नाहीतर उमेदवारही देणार होते. पण मराठा समाजाचा उमेदवार पराभूत झाला तर आंदोलन धोक्यात येईल असं म्हणत जरांगेंनी उमेदवार देण्यास नकार दिला. पण मराठा समाजाने काय निर्णय घ्यायचा हे मराठा समाजावर सोपवले आहे. त्यामुळे मराठा समाजाची मतं मराठवाड्यात गेमचेंजर ठरू शकतील.