TRENDING:

Maharashtra Govt Formation BJP : महायुती सरकारसाठी दिल्लीत खलबतं, भाजप कोणती मंत्रिपदे सोडणार? समोर आली अपडेट

Last Updated:

Maharashtra Government Formation BJP : भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही खाती सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
,प्रतिनिधी : राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते.
महायुती सरकारसाठी दिल्लीत खलबंत भाजप कोणती मंत्रिपदे सोडणार? समोर आली अपडेट
महायुती सरकारसाठी दिल्लीत खलबंत भाजप कोणती मंत्रिपदे सोडणार? समोर आली अपडेट
advertisement

दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विविध प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यावर भाजपने पर्याय दिला आहे. 'न्यूज 18 लोकमत'ला भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने खातेवाटपाचा फॉर्म्युला सादर केला आहे. यानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही खाती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज, दुपारी मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

advertisement

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. रात्री उशिरा एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद तसंच उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाली आहे.

भाजपचा खाते वाटपाचा प्रस्ताव काय?

advertisement

सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडे महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, भाजपकडून त्याला नकार देण्यात आला आहे.

भाजपकडे कोणती खाती?

गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे.

advertisement

एकनाथ शिंदेंना कोणती खाती?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाते?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला आणि बाल विकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास ,अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

इतर संबंधित बातमी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

अमित शाह यांच्यासोबत बैठक, फडणवीस यांना वरिष्ठांची पसंती, मंत्रिमंडळातील १५ चेहरे समोर!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt Formation BJP : महायुती सरकारसाठी दिल्लीत खलबतं, भाजप कोणती मंत्रिपदे सोडणार? समोर आली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल