राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर तिढा सुरू झाला. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वेगवेगळे दावे होऊ लागल्याने हा तिढा वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दिल्लीत अंतिम निर्णय होईल असा सूर आळवला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिले.
advertisement
भाजपने कोणती ऑफर दिली?
भाजपने शिंदे यांना 2 ऑफर दिल्या आहेत. यात थेट मोदींच्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे. जर शिंदे यांनी ही ऑफर स्वीकारली तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये सामील होण्याची संधी आहे. तर एकनाथ शिंदे यांना भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ॲाफर दिली आहे. मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहणार आहे. त्यामुळे भाजपने शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यावी लागणार आहे.
केंद्रातील मंत्रिपदाबाबत शिंदे यांनी काय म्हटले?
पत्रकार परिषदेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद घेणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, मला तुम्ही तिकडे मला कशाला पाठवताय, असा उलट सवाल हसत हसत केला. यावर त्यांनी आपल्याला राज्यातील राजकारणात रस असल्याचे स्पष्ट केले.
